आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Weater News In Marathi, Hailstorm, America, Divya Marathi

बळीराजाचा हवाला अजूनही दैवावरच,गारपिटीचा अंदाज लावणे खर्चिक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उष्ण कटिबंधात येणा-या आणि विषुववृत्ताजवळ असलेल्या महाराष्‍ट्रासारख्या या प्रदेशात गारपिटीचा आगाऊ अंदाज वर्तवणे ही मुळातच महाकठीण गोष्ट आहे. त्यातूनही संभाव्य गारपिटीचा मागोवा घ्यायचाच झाल्यास त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक सामग्रीही राज्यात उपलब्ध नाही. त्यामुळे गारपिटीच्या संकटात दैवावर हवाला ठेवण्यावाचून दुसरा पर्याय तूर्त तरी नाही. अमेरिकेसारख्या प्रगत देशातसुद्धा प्रत्यक्ष गारपिटीपूर्वी दोन-तीन तास नेमका अंदाज वर्तवला जातो.

भारतीय हवामान विभागाच्या उपमहासंचालक (हवामान अंदाज) डॉ. मेधा खोले यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले की, समशितोष्ण प्रदेशात काश्मिरमधील हिमवर्षावाचा अचूक अंदाज हवामान खात्याला देता येतो. मॉन्सूनचा अंदाज वर्तवणारी विविध मॉडेल्स आपल्याकडे आहेत. मात्र, अमूक एका ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज गारपीट होण्यापूर्वी केवळ दोन-तीन तास आधीच लागतो. शीत व समशितोष्ण प्रदेशात असे अंदाज व्यक्त करणे तुलनेने शक्य आहे. दोन्ही बाजूने समुद्र असलेल्या भारतासारख्या उष्ण कटीबंधीय देशात गारपिटीचा अंदाज देणे अवघड आहे.

आणखी तीन-चार दिवस गारपीट
मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्‍ट्रात अवकाळी पाऊस व गारपिटीची भीती आणखी तीन-चार दिवस कायम असली तरी जोर ओसरत चालला आहे. पुढील आठवड्यात तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. एप्रिलमधले तापमान सरासरीपेक्षा थोडे जास्त राहण्याची शक्यता आहे. एप्रिलमध्ये पावसाचा अंदाज नाही.
डॉ. शिवानंद पै, आयएमडीचे दीघर्कालीन हवामान अंदाज विभाग प्रमुख

अपवादात्मक आणि अभुतपूर्व
गेल्या आठवड्यापाूसन केवळ महाराष्‍ट्रातच नव्हे तर संपूर्ण मध्य भारतात अनेक ठिकाणी सुरू असलेली गारपीट ही देशाच्या हवामान इतिहासातील अत्यंत ‘अपवादात्मक घटना’ म्हणावी लागेल. साधारणत: एप्रिलच्या मध्यानंतर जमीन तापलेली असते. त्यानंतर आपल्या देशात क्वचित ठिकाणी वळवाचा वादली पाऊस किंवा तुरळक ठिकाणी गारा पडण्याचे प्रसंग घडतात. परंतु, हिवाळा संपताना, उन्हाळ्याच्या तोंडावर तीन-चार राज्यांमध्ये अनेक ठिकाणी गारपीट होण्याची घटना अभुतपूर्व आहे. गेल्या कित्येक वर्षात अशा गारपिटीची नोंद देशात झालेली नाही, असे डॉ. मेधा खोले म्हणाल्या.

बंगाली वारे बाधले
भूभागापासून पाच ते सहा किलोमीटर उंचीवरून पश्चिम दिशेने थंड आणि कोरडे वारे मध्य भारताकडे वाहू लागले. त्याचवेळी बंगालच्या उपसागरातून उष्ण आणि बाष्पयुक्त वारे मध्य भारताच्या दिशेने आले. एरवी पश्चिमेकडचे वारे मध्य भारतातून पूर्वेकडे निघून जातात. तर बंगालच्या उपसागरातून येणारे उष्ण वारे दक्षिणेकडील राज्यांच्या दिशेने वाहतात. परंतु, यावेळी अत्यंत परस्परविरोधी गुणधर्म असलेले पूर्व-पश्चिमेचे वारे महाराष्‍ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आदी भूभागावर एकत्र आले. याच दरम्यान हिवाळा संपत आल्याने दिवसाच्या तापमानात वाढ होऊ लागली आणि जमिनीवरून मोठ्या प्रमाणात गरम हवा ढगांच्या दिशेने जात राहिली. विचित्र हवामानामुळे बाष्पाचे रुपांतर गारांमध्ये झाले.


भारतीय हवामान विभागाच्या उपमहासंचालक डॉ. मेधा खोले यांनी सांगितले की, समशीतोष्ण प्रदेशात काश्मीरमधील हिमवर्षावाचा अचूक अंदाज हवामान खात्याला देता येतो. मात्र, अमुक एका ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज केवळ दोन-तीन तास आधीच लागतो. शीत व समशीतोष्ण प्रदेशात असे अंदाज व्यक्त करणे तुलनेने शक्य आहे. दोन्ही बाजूंनी समुद्र असलेल्या भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात गारपिटीचा अंदाज देणे अवघड आहे.
सध्याची गारपीट ही देशाच्या हवामान इतिहासातील ‘अपवादात्मक घटना’ म्हणावी लागेल. एप्रिलच्या मध्यानंतर जमीन तापलेली असते. त्यानंतर देशात क्वचित ठिकाणी वळवाचा वादळी किंवा तुरळक ठिकाणी गारा
पडतात. परंतु उन्हाळ्याच्या तोंडावर तीन-चार राज्यांमध्ये अनेक ठिकाणी गारपीट होण्याची घटना अभूतपूर्व आहे. गेल्या कित्येक वर्षांत अशा गारपिटीची नोंद देशात झालेली नाही, असे डॉ. मेधा खोले म्हणाल्या.


का लागत नाही गारपिटीचा थांग?
ढगांत गारा तयार होण्याची प्रक्रिया वेगवान असते. ही क्षमता असणारे ढग किती प्रमाणात, कोठे तयार होतील व गारांच्या आकारांचा अंदाज येण्यासाठी ढगांमध्ये पाहणारी यंत्रणा असावी लागते. रडारची क्षमता चारशे किलोमीटर आवश्यक असल्याने हा प्रकल्प खर्चिक आहे. शिवाय अचूक अंदाज येईलच असे नाही. पश्चिमेत भौतिकशास्त्र भिन्न असल्याने तेथे याचा अंदाज करणे शक्य आहे.


डॉप्लर रडारचा प्रस्ताव केंद्राकडे
चेन्नई, कोलकाता आदी ठिकाणी अत्याधुनिक डॉप्लर रडार यंत्रणा आहे. पश्चिमेपेक्षा पूर्व किनारपट्टीला वादळांचा धोका अधिक असल्याने या भागात आधुनिक यंत्रणेसाठी प्राधान्य दिले जाते. यंदा पंचवार्षिक योजनेत डॉप्लर रडार व केंद्रांच्या उभारणीचा समावेश असून मुंबई, गोवा, नागपूर, औरंगाबाद, नाशिक आदी ठिकाणी काम सुरू आहे.