आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील हवामानामध्ये तीव्र चढ-उतारांचा खेळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - राज्यातील काही भागात रात्रीच्या गारव्यात वाढ आणि दिवसाच्या तापमानात वाढ झाल्याने विषम हवामानाचा अनुभव येत आहे. ब-याच ठिकाणी किमान तापमान सुमारे दोन ते चार अंशांनी घटले आहे, तर काही ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याची नोंद वेधशाळेत झाली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून हवामानातील चढ-उतारांचा खेळ रंगला आहे. ही परिस्थिती येत्या चोवीस तासांत कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर मात्र उकाड्यात वाढ होणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिले आहेत.

राज्यात काल सर्वाधिक तापमानाची नोंद भिरा येथे 40.5 अंश सेल्सिअस तर सर्वात कमी तापमानाची नोंद अहमदनगर येथे 12.2 इतकी झाली. कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ, तर मराठवाडा व विदर्भाच्या तसेच मध्य महाराष्ट्राच्या उर्वरीत भागात किचिंत वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. उर्वरीत भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. अन्यत्र किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान
शहर कमाल किमान
औरंगाबाद 35 17.4
नाशिक 34.7 13.1
सोलापूर 38 20.1
अहमदनगर 35 12.2
जळगाव 37.6 15.8
पुणे 34 12.7
नागपूर 35.6 14.7
अमरावती 36.6 16.8
कोल्हापूर 35 20.6
मुंबई 37.5 23.5