आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भात नागपूरसह अकोला, अमरावतीही तापले, पारा 45 अंशांवर, राज्यात उष्ण शहरांची संख्या वाढली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- राज्यात सर्व दिशांनी येणाऱ्या उष्ण-कोरड्या वाऱ्यांमुळे पसरलेली उष्णतेची लाट– सरण्याची कुठलीही चिन्हे नसून, आगामी पाच दिवस उष्णतेची लाट टिकून राहील, असा इशारा हवामानशास्त्र विभागाने जारी केला आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा, अकोला अशा शहरांनी 45 अंशांपेक्षा अधिक कमाल तापमानाची नोंद केल्याने राज्यात उष्ण शहरांची संख्या वाढती असल्याचे स्पष्ट झाले आहे. उष्णतेची लाट अतितीव्र, तीव्र असण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.  
 
राज्यात जळगाव 44.6, मालेगाव 42.2. सोलापूर 43.2, उस्मानाबाद 42.9, परभणी 44, अकोला 44.8, बीड 43.4, अमरावती 44.2, चंद्रपूर 45.9, ब्रह्मपुरी 44.2, गोंदिया 43.5, नागपूर 44, वाशिम 43, वर्धा 44.5, यवतमाळ 43 अशी उष्ण शहरे नोंदवली गेली आहेत. ज्या शहरांचे कमाल तापमान 42 अंशांच्या पुढे आहे, अशी ही शहरे आहेत. याशिवाय चाळीशी पार केलेल्या शहरांत सातारा 40.7, औरंगाबाद 41.6, बुलढाणा 41.3 यांचा समावेश आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...