आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात 3 दिवसानंतर मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अंदाज, मराठवाड्याला मिळणार दिलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राज्यात 3 दिवसानंतर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. - Divya Marathi
राज्यात 3 दिवसानंतर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
पुणे- राज्यात 3 दिवसानंतर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. येत्या शुक्रवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात पाऊस कोसळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पावसाची आतूरतेने वाट पाहणाऱ्या बळीराजालाही दिलासा मिळणार आहे.
 
मराठवाड्यात मागील अनेक दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. दुष्काळामुळे शेतकरीवर्ग पूरता हतबल झाला आहे. जुलैमध्ये 355 पैकी तब्बल 223 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्केही पाऊस झालेला नाही. त्यात मराठवाडा आणि विदर्भातील अनेक तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्केही पावसाने कृपा दाखवलेली नाही. त्यामुळे आता तरी पावसाची प्रतिक्षा संपेल, अशी आशा बळीराजाला आहे.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...