आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • West Maharashtra Sanghchalak Kacheshwar Sahane Died

पश्चिम महाराष्ट्र संघचालक कचेश्वर सहाणे यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक प्रा. कचेश्वर सहाणे (वय 72) यांचे गुरुवारी पहाटे अहमदनगर येथे निधन झाले. इच्छेनुसार त्यांचे नेत्रदान करण्यात आले. सन 2000 पासून ते संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक होते. तीस वर्षांपासून त्यांनी संघाच्या अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या.

विद्या प्रतिष्ठान संचालित डॉ. हेडगेवार प्रतिष्ठानचे ते उपाध्यक्ष होते. भारतीय किसान संघ, वाल्मीकी सेवा प्रतिष्ठान, राष्ट्रहित संवर्धक मंडळ आदी संस्थांच्या जबाबदार्‍याही त्यांनी सांभाळल्या. प्रा. सहाणे हे मूळचे संगमनेर तालुक्यातील चिकणी गावचे. बालपणीच मातापित्यांचे छत्र हरपल्याने त्यांचे शिक्षण नाशिकमधील सिन्नर येथे झाले. इतिहासाचा त्यांचा व्यासंग होता. सिन्नर येथे असतानाच त्यांचा राष्ट्रसेवा दलाची संबंध आला. संघाचे प्रचारक नाना ढोबळे यांच्या प्रेरणेने त्यांनी संघकार्याला वाहून घेतले आणि अखेरपर्यंत ते संघासाठी कार्यरत राहिले. संघाचे काम, शिक्षण क्षेत्र यासह शेतीमध्ये त्यांनी अनेक पारंपरिक प्रयोग केले. त्या त्या भागातील तरुणांना एकत्र करून सहकारी सोसायटीही स्थापन केली. त्यातून स्वयंरोजगाराचे प्रयोग यशस्वी झाले. प्राध्यापक म्हणूनही ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते.