आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • What Maharashtra Get In First Union Budget Of The Narendra Modi Government

UNION BUDGET : यंदाच्या अर्थसंकल्पाने पुणे-मुंबईसह महाराष्ट्राला काय दिले?, वाचा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो सौजन्य: विकिपिडीया

पुणे- 'अच्छे दिन'चा आश्वासन दिलेल्या मोदी सरकारने आपला 2014- 2015 या आर्थिक वर्षासाठी पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कोणत्याही लोकप्रिय घोषणा न करता संतुलित बजेट सादर केले. महाराष्ट्रात आगामी तीन महिन्यात होणा-या विधानसभा निवडणुका लक्षात घेता काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. मात्र, नोकरदारांना विशेष दिलासा दिलेला नाही. मुंबईकरांना या अर्थसंकल्पातून काहीही मिळाले नसल्याचे चित्र आहे. पुण्यात बायोटेक्नालॉजी क्लस्टरसह युवकांसाठी व क्रीडा विकास कार्यक्रमातंर्गत प्रकल्पांसाठी तरतूद केली आहे. विदर्भात नागपूरला दिल्लीच्या धर्तीवर एम्म स्थापन केले जाऊ शकते. महाराष्ट्राच्या वाट्याला एक आयआयएम स्थापले जाणार आहे. मात्र ते कोठे असावे याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे.

पुढे वाचा, महाराष्ट्राला काय-काय मिळाले या बजेटमधून....

- महाराष्ट्राच्या बड्या शहरांच्या आसपास स्‍मार्ट सिटी बनविण्याची योजना, स्मार्ट सिटींसाठी एफडीआयचा प्रस्ताव
- देशातील प्रत्येक राज्यात आयआयएम खोलू असे मोदींनी निवडणुकीपूर्वी सांगितले होते. त्यानुसार महाराष्ट्रात एक आयआयएम खोलले जाईल. हे आयआयएम कोठे असावे याचा निर्णय राज्य सरकार घेईल. मात्र, ही संस्था पुण्यात होण्याची शक्यता आहे.
- पीपीपी मॉडेलनुसार महाराष्ट्रात अनेक मॉडेल शहरे विकसित केली जातील.

- फिल्म एंड टेलिव्हिजन संस्था, पुणे याला चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रातील राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळू शकतो.

- महाराष्ट्रातील विदर्भात एम्म्स खोलले जाणार, शक्यतो नागपूर येथे उभारले जाऊ शकते.

- नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोर ( मुंबई ते बंगळुरू) ला वेगवेगल्या शहरांसाठी जोडण्यासाठी 1 अब्ज रूपयांची गुंतवणूक केली जाणार. यासाठी ब्रिटन सरकारने पुढाकार घेतला आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव शहरांना व त्याच्या आसपासच्या भागांना मोठा फायदा होणार.

- पुण्यात नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडोरचे मुख्यालय बनविले जाणार.

- 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणा-या शहरात मेट्रोसाठी केंद्र सरकार मदत करणार. याचा फायदा मुंबई ( जेथे यापूर्वीच आहेच), ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांना होणार

- पुण्यात बायोटेक्नोलॉजी क्लस्टर सुरु होणार.
- युवकांसाठी राबविण्यात येणारे विशेष कार्यक्रमाचे ठिकाणही पुणेच राहणार
- क्रीडा विभागातंर्गत ऑलिपिंकच्या धर्तीवर विविध क्रीडांगणे व क्रीडा विकास कार्यक्रमाचे प्रकल्पाचे ठिकाण पुणेच राहणार.