आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी आहे ओशोंच्‍या आश्रमातील लाइफ, प्रवेशापूर्वी एड्स चाचणी सक्‍तीची

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथील आचार्य रजनीश 'ओशो' यांच्‍या आश्रमात रोज जगाच्‍या कानाकोप-यातून त्‍यांचे हजारो अनुयायी हजेरी लावतात. यामध्‍ये बॉलीवुड आणि हॉलीवुडचे अनेक सेलेब्रिटीजसुद्धा आघाडीवर असतात. 11 डिसेंबरला ओशोंचा जन्‍मदिवस आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे पुण्‍यातील ओशोंचा आश्रम आणि त्‍यात राहणा-या भाविकांच्‍या जीवनशैलीविषयी. या आश्रमात प्रवेश घेण्‍यापूर्वी प्रत्‍येक अनुयायाला एचआयव्‍ही एड्सची चाचणी करणे अनिवार्य आहे.
आतून खूप आकर्षक आहे आश्रम
आपल्‍या विनधास्‍त आणि स्पष्ट विचारांमुळे ओशो कायम चर्चेत राहिलेत. त्‍यांच्‍या विचाराप्रमाणेच पुण्‍यातील कोरेगाव पार्क परिसरातील 28 एकर जागेत त्‍यांचा आश्रम आहे. 1974 मध्‍ये तो बांधण्‍यात आला. या ठिकाणी नैसर्गिक वातावरणाला आधुनिकतेची जोड देण्‍यात आलेली आहे. आत गवताचे गालीचे, संगमवर दगडाचे नक्षीकाम, काळ्या रंगात बांधलेली आकर्षक इमारत, पाण्‍याचे कृत्रिम झरे, चहुकडे हिरवळ, गार हवा, ओलिंपिक साइजचे स्विमिंग पूल आणि जवळपास बसलेले विदेशी अनुयायी दिसतात. आश्रमातील हे देखावे कुणाच्‍याही मनाला हवेहवेसे वाटतात.
प्रवेशापूर्वी एचआयव्‍ही एड्स चाचणी सक्‍तीची
या आश्रमात प्रवेश करण्‍यापूर्वी मुख्‍य गेटवर असलेल्‍या रिसेप्शन सेंटरवर 1500 रुपये शुल्‍क भरून आत जाण्‍यासाठी नोंदणी करावी लागते. नंतर नोंदणी केलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या एचआयव्‍ही चाचणीसाठी ब्लडचे सँपल घेतले जाते. त्‍यानंतरच तिला आश्रमात प्रवेश दिला जातो. यासाठी विशिष्‍ट्य ओळखपत्र दिले जाते.

आश्रमात ड्रेस कोड
आश्रमात एक ड्रेस कोड लागू आहे. येथे येणा-या प्रत्‍येक व्‍यक्‍तीला लाल आणि पांढ-या रंगाचा एक विशेष गणवेश परिधान करणे अनिवार्य आहे. हा गणवेश आश्रमाबाहेर स्‍वस्‍त दरात उपलब्‍ध आहे. आश्रमात राहण्‍यासाठी प्रति दिन 6 हजार ते 10 हजार भाड्यावर खोली मिळते. श शिवाय आश्रमाबाहेरसुद्धा काही हॉटेल आहेत तिथे या पेक्षा कमी दरात रुम मिळतात.
असे आहे आतील वातावरण
आश्रमात प्रवेश केल्‍यानंतर एक इंडक्शन क्लास घेतला जातो. यामध्‍ये 30 ते 40 व्‍यक्‍ती सहभागी असतात. त्‍या नंतर आश्रमला फेरफटका मारला जातो. रात्रीच्‍या वेळी येथील मेडिटेशन रिजॉर्टचे विलासी जीवन पाहण्‍यासारखे असते. येथे उघड्या आकाशाखाली जेवण, संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम होतो. यात ब्राजील, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जापान, रशिया आणि ब्रिटेनसह इतर देशातील आलेले 100 पेक्षा अधिक विदेशी अनुयायी भाग घेतात. येथे ताण-तणाव दूर करण्‍याचा प्रयत्‍न केला जातो.
पुढील स्लाइड्सवर पाहा, आश्रमातील PHOTOS आणि जाणून घ्‍या ओशोंबद्दल...