आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : पुण्‍यातील मुलीच्‍या लग्‍नात आले होते मार्क जुकरबर्ग, मनसोक्‍त नृत्‍यही केले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मार्क यांनी हा फोटो आपल्‍या फेसबुक वॉलवरही पोस्‍ट केला होता. - Divya Marathi
मार्क यांनी हा फोटो आपल्‍या फेसबुक वॉलवरही पोस्‍ट केला होता.
पुणे - फेसबुकचे प्रमुख मार्क जुकरबर्ग यांनी नुकताच भारत दौरा केला. यात त्‍यांनी जगप्रसिद्ध ताजमहलाला भेट दिली. शिवाय भारतीय विद्यार्थ्‍यांसोबत दिलखुलास गप्‍पा केल्‍या. मात्र, मार्क यांची ही पहिली भारत भेट नव्‍हती. यापूर्वी फेसबुकच्‍या पहिल्‍या महिला इंजीनिअर रुची सांघवी यांच्‍या लग्‍नसोहळ्यासाठी 2010 मध्‍ये ते आपली पत्‍नी प्रिसिला चान यांच्‍यासोबत (तेव्‍हाची प्रेयसी) भारतात आले होते. त्‍या वेळी त्‍यांनी मनसोक्‍त नृत्‍य केले होते. एवढेच नाही तर मार्क यांनी हा फोटो आपल्‍या फेसबुक वॉलवरही पोस्‍ट केला होता.
भारतीय वेशभूषेत केले नृत्‍य
पुण्‍यात राहणाऱ्या रुची यांनी फेसबुकसाठी 'न्यूज फीड'चे फीचर तयार केले होते. फेसबुकमध्‍ये कार्यरत असताना त्‍यांनी फेसबुकच्‍या इंजीनिअरिंग डिपार्टमेंटचे डायरेक्टर आदित्य अग्रवाल यांच्‍यासोबत जानेवारी 2010 मध्‍ये लग्‍न केले. या लग्‍नात मार्क हे आपल्‍या खास मित्रांसह सहभागी झाले होते. गोव्‍यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्‍ये हा सोहळा पार पाडला. यामध्‍ये मार्क यांनी ट्रेडिशनल इंडियन ड्रेस परिधान केला होता. त्‍यांच्‍या पत्‍नीनेही 'लहंगा-चुनरी' घातली होती. तसेच हातावर मेंदी काढली होती. नवरी आणि नवरदेवाच्‍या आग्रहामुळे या दोघांनी हिंदी गाण्‍यावर नृत्‍यही केले होते.
लग्‍नानंतर सोडले फेसबुक
फेसबुकच्‍या पहिल्‍या 10 इंजीनिअर्समध्‍ये रुची या एकमेव महिला होत्‍या. त्‍यांनी आपल्‍या कल्‍पकतेने फेसबुकमध्‍ये अमुलाग्र बदल घडवून आणला. लग्‍नानंतर या दाम्‍पत्‍याने फेसबुकची नोकरी सोडली आणि आपली स्‍वत:ची 'कोव' ही कंपनी सुरू केली. फेब्रुवारी 2012 मध्‍ये या कंपनीला 'ड्रॉपबॉक्स' नावाच्‍या कॉम्‍प्‍युटर डेटा शेयरिंग कंपनीने विकत घेतले.
पुढील स्लाइड्सवर पाहा रुची यांच्‍या लग्‍नाचे काही निवडक PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...