आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Who Dare To Barracked Kalamadi From Asian Atheletic Championships

आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेपासून सुरेश कलमाडींना कोण अडवणार?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पुढील महिन्यात पुण्यात होणा-या विसाव्या आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत मिरवण्यापासून खासदार सुरेश कलमाडी यांना कोणीही अडवू शकणार नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्य शासन, केंद्र शासन आणि भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या वतीने आयोजित या स्पर्धेच्या नियोजनातून कलमाडी यांना कसोशीने वगळण्यात आले. मात्र, आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या कलमाडींना उद्घाटन सोहळ्यापासून बाजूला कसे ठेवायचे, हे कोडे आयोजकांना उलगडलेले नाही.


राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी सांगितले, ‘यापूर्वीच्या क्रीडा स्पर्धांना गालबोट लावणा-यांना स्पर्धेच्या आयोजनापासून लांब ठेवले आहे. कलमाडी यांना ‘जाणीवपूर्वक’ सहभागी करून न घेण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला.’ असे असले तरी आशियाई अ‍ॅथलेटिक्स महासंघाचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने उद्घाटन सोहळ्यात येण्यापासून कलमाडींना रोखता येणार नाही, अप्रत्यक्ष कबुलीही त्यांनी दिली. ऐंशीच्या दशकापासून स्पर्धा घेणा-या कलमाडींना ‘सबसे बडा खिलाडी’ म्हटले जाते. मात्र, पहिल्यांदाच त्यांना धक्का बसला आहे.


स्पर्धेच्या आयोजनात पडद्यामागे कलमाडीच
आशियाई अ‍ॅथलेटिक महासंघाचे अध्यक्ष कलमाडी आहेत. पुणे अ‍ॅथलेटिक महासंघाही कलमाडी समर्थक प्रल्हाद सावंत यांच्याच ताब्यात आहे. कलमाडी यांच्याच इच्छेनुसार पुण्यात आशियाई स्पर्धा घेतली जात आहे. या निमित्ताने कलमाडी यांना नव्याने प्रतिष्ठा मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.


घोटाळ्याइतके ‘बजेट’च नाही
राष्ट्रकुल स्पर्धांमधल्या घोटाळ्यावरून सरकार अडचणीत आले. त्यामुळे पुण्यातल्या स्पर्धेत काय खबरदारी घेतली जात आहे, असा प्रश्न वळवी यांना केला. यावर त्यांनी तत्परतेने उत्तर दिले, की घोटाळा करण्याइतके बजेटच नाही. सरकारने 18 कोटी रुपयांचीच तरतूद केली आहे.