आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Why Should Not Shay Showing Black Flag, Ajit Pawar Again Talked On Drought

काळे झेंडे दाखवताना लाज कशी वाटली नाही, अजित पवारांनी पुन्हा फटकारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - ‘बारामतीकरांसाठी पवार साहेबांनी 43 वर्षे जिवाचे रान केले. आजारी असतानाही ते दिवस-रात्र काम करतात. असे असताना वाढदिवशी त्यांना काळे झेंडे दाखवताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही?’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा दुष्काळग्रस्तांना फटकारले.
यापूर्वी दुष्काळाच्या प्रश्नावर अश्लाघ्य वक्तव्य करून अजित पवार यांनी दुष्काळग्रस्तांचा रोष ओढवून घेतला होता. त्यापाठोपाठ शनिवारी बारामती तालुक्यातील जळगाव सुपा येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यातही दादांनी पुन्हा तोच कित्ता गिरवला. उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘बारामतीत विकासकामे सुरू असताना आपल्यातीलच काही लोक दुष्काळग्रस्त गावातील लोकांना भडकून देण्याचे काम करत आहेत. राष्‍ट्रवादीचे पदाधिकारी लोकांशी संपर्क ठेवण्यात कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेला उशीर झाल्याची कबुली देताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, अर्थसंकल्पात संपूर्ण महाराष्‍ट्राचा विचार करावा लागतो. बारामती तालुक्यातील दुष्काळी जनतेला पाणी देऊ म्हणणा-या माधव भंडारींनी स्वत:च्या राजकीय जीवनात एक तरी विधानसभा मतदारसंघ उभा केला का? असा सवालही त्यांनी केला. पाणी देण्याची घोषणा करणारे आमदार विजय शिवतारे हेच दुष्काळी भागात येणारे पाणी अडवत असल्याचा आरोपही पवारांनी केला.
फक्त 40 टक्के ओलिताखाली
इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह कोणीही असले तरी देश व राज्यातील शंभर टक्के जमीन कधीच ओलिताखाली येऊ शकत नाही. मीही राज्याचा जलसंपदा मंत्री होतो. माझ्या काळात राज्यात सिंचन वाढविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. लवादाने सांगितल्याप्रमाणे राज्यातील सर्व प्रकारे पाणी अडवले तरी राज्यातील कमाल 40 टक्केच क्षेत्र ओलिताखाली येईल, असा दावाही पवारांनी केला.
गृहमंत्री पाटील यांना दणका
बारामती तालुक्यातील कारखेल येथील स्वामी विवेकांनंद शिक्षण संस्थेची इमारत उभारण्याची मागणी होत आहे. या विषयावर पवार म्हणाले की, शाळा चालवणारा माणूस कोल्हापूरचा अन ् पैसे द्यायचे आम्ही ? आम्ही पैसे द्यायला मोकळे आहोत काय? अशा शब्दात अजित पवार यांनी आपल्याच पक्षाचे मंत्री आर. आर. पाटील यांना सुनावले. या संस्थेचे अध्यक्ष गृहमंत्री पाटील आहेत.