आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wife & Her Lovers Murders Govt. Officer Husbund Near Solapur

विषारी साप डसवून प्रियकर व सर्पमित्रांच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकलूज (सोलापूर)- अनैतिक संबंधास अडसर ठरणाऱ्या नवऱ्याचा खून करण्यासाठी पत्नीने नवऱ्यावर विषारी साप सोडला. साप पाहून ओरडणाऱ्या नवऱ्याचे नाक, तोंड उशीने दाबले. सापालाही चावायला भाग पाडले. अशा विचित्र पद्धतीने नवऱ्याचा खून केल्याची घटना माळशिरस येथे उघडकीस आली. प्रकाश सावंत असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, मागील शुक्रवारी (दि. 6) माळशिरस येथील प्रकाश सावंत (वय 45) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचा बनाव त्यांची पत्नी लतिका सावंत (वय 40) हिने केला. नातेवाइकांनी आग्रह धरल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवालात प्रकाश सावंत यांचा मृत्यू गुदमरून झाल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाच्या पाय आणि नरडीवर जखमेच्या खुणा आहेत. पण, त्या नेमक्या कशाच्या आहेत ते अद्याप निष्पन्न झाल्याने व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे, असे शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.
या घटनेमागचा संशय बळावल्याने माळशिरसचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी वेगवेगळ्या दिशेने तपास केल्यानंतर सावंत यांचा खून त्यांची पत्नी लतिका, तिचा प्रियकर देविदास रणदिवे यांनी सर्पमित्र दत्तात्रय जगताप, राहुल जाधव, विनायक जगताप आणि वैभव मोहिते यांच्या मदतीने केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी सर्व सहा आरोपींना अटक केली आहे. प्रत्यक्षात 3 मार्च रोजीच गडहिंग्लज येथे जाऊन सुपारी घेतलेल्या वरील लोकांनी प्रकाश सावंत यांच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तेथील वर्दळीमुळे तो प्रयत्न फसला. नंतर त्यांनी मार्चला साप चावल्याचा बनाव करून खून केला.

असा शिजला खुनाचा कट- प्रकाश सावंत हे गडहिंग्लज येथे कृषी अधिकारी होते. दरम्यान, पत्नी लतिका हिचे चुलत मामेभाऊ देविदास रणदिवे (रा. मंजवडी, ता. फलटण) याच्याबरोबर अनैतिक संबंध होते. त्याने वैभव मोहिते (रा. फलटण), दत्तात्रय जगताप, राहुल जाधव विनायक जगताप (तिघे रा. विडणी, ता. फलटण) यांच्या मदतीने खुनाचा कट आखला. त्यासाठी रणदिवे याने दीड लाख रुपयांची सुपारी दिली. सावंत यांच्याजवळ साप ढसवण्यासाठी विषारी साप सोडला. साप पाहून ओरडताच यातील सर्वांनी सावंत यांचे नाक, तोंड उशीने दाबले. तेव्हा सावंत यांच्या पायाला गळ्याला साप चावला. पत्नीने आपल्या नवऱ्याला साप चावल्याचा बनाव रचला होता.