आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहबाह्य संबंधांत अडसर ठरणा-या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीकडून खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- विवाहबाह्य संबंधांत अडसर ठरत असलेल्या पतीला झोपेच्या गोळ्या देऊन प्रियकराच्या मदतीने ठार मारणा-या पत्नीला पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. याचबरोबर पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. ही घटना कात्रज येथे ३१ मेच्या मध्यरात्री घडली.

भगवतीप्रसाद रामदयाल गांधी (वय ३४) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्याची पत्नी पूनम गांधी (वय २७) व निखील दीपक कांबळे (वय २३) यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबतची माहिती अशी की, भगवतीप्रसाद यांचे आंबेगाव बुद्रुक येथे कापडाचे दुकान होते. त्यांचे बारा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. गांधी यांना दहा व आठ वर्षाची दोन मुले आहेत. पत्नी पूनमही दुकानात गांधी यांना दुकानात मदत करीत असे. मात्र याच काळात पूनम व तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान असलेल्या निखील या युवकासोबत प्रेमसंबंध जुळले. त्यामुळे हळू-हळू दुकानात तिची मदत कमी झाली. गांधी दुकानात असताना पूनम निखीलला घरी बोलायची. दरम्यान, पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांची कूणकूण गांधी यांना लागली. त्यामुळे या पती-पत्नीत नेहमी भांडणे होऊ लागली. तसेच पूनम व निखीलला गांधी यांनी समज दिली. मात्र पतीमुळे निखीलला भेटता येत नसल्याचे लक्षात येताच पूनम आणि निखील यांनी गांधीचा काटा काढायचे ठरवले.

त्यानुसार, ३१ मेच्या रात्री जेवण झाल्यावर पूनमने पतीला कढी प्यायला दिली. त्यात पूनमने झोपेच्या गोळ्या टाकल्या. त्यानंतर पूनमने निखीलला घरी बोलावले. निखील रात्री साडेबाराच्या सुमारास पूनमच्या घरी पोहचला व गांधीचा गळा दाबला. मात्र गांधी यांना त्यावेळी थोडीफार शुद्ध आली. त्यामुळे त्यांनी या दोघांना विरोध केला. मात्र पत्नी पूनमने गांधी यांच्या गुप्तांगावर लाकडाने जोरदार प्रहार केले. काही वेळानंतर गांधी यांचा मृत्यू झाला व त्यानंतर पूनम व निखील यांनी सांडलेले रक्त चादरीने पुसले व गांधीचा मृतदेह बेडवर ठेवला. सकाळी पत्नीने पतीचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना कळवली. तसेच रात्री जेवण झाल्यानंतर दारू प्यायला बाहेर गेल्यानंतर त्यांना कोणीतरी मारहाण केली. तसेच त्यांनी डॉक्टरांकडे जाण्यास नकार दिला. रात्री झोपले असता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती पत्नी पूनमने पोलिसांनी दिली. मात्र पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्यांचा गळा दाबल्याचा व गुप्तांगावर मारहाणीचे वण होते. पूनम उत्तरे विसंगत देत होती. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच तिने पूनमने गुन्हा कबूल केला व प्रियकर निखीलच्या मदतीने पतीचा खून केल्याची कबूली दिली. या दोघांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.