आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वटपौर्णिमेच्या दिवशीच हत्याकांड; पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती- परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या करून स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशीच बारामतीत हे हत्याकांड उघडकीस आले.

बारामती शहरापासून जवळच असलेल्या एका ओढ्यालगत हातभट्टीची दारू काढली जाते. या परिसरातील झोपडपट्टीतील राहणारे अनेक लोक हा व्यवसाय करतात. रवींद्र पोपट लांडगे (वय 40) व त्यांचे कुटुंबदेखील यातूनच उदरनिर्वाह करत होते. गुरुवारी सकाळी ओढ्यालगत लांडगे दांपत्य मृतावस्थेत आढळून आले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर माहिती मिळाली की, घराशेजारी राहणार्‍या सूरज मोरे याच्यासोबत आपली पत्नी अलका हिचे अनैतिक सबंध असल्याचा रवींद्रला संशय होता. यातूनच त्याने अलकाच्या डोक्यात दांडक्याने जोरदार प्रहार करून तिचा खून केला. तसेच या घटनेनंतर बायकोच्या साडीने त्याच ठिकाणी झाडाला गळफास घेऊन रवींद्रने आत्महत्या केली. दरम्यान, मृत दांपत्याच्या मुलीने पोलिसात दिलेल्या जबाबानंतर संशयित सूरजवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका मृतांच्या नातेवाइकांनी घेतली होती. त्यामुळे पोलिसांनी सूरजला अटक केली. रात्री उशिरापर्यंत आणखी एक जणावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

आरोपी सूरजवर अलकाशी अनैतिक संबंध ठेवून रवींद्रला पत्नीचा खून करण्यास व नंतर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.