आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्याच्या संशयावरून माथेफिरूकडून पत्नी आणि मुलीसह तीन मांजरीचीही हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नी व एक वर्षाच्या मुलीसह तीन मांजरीचा खून केल्याची घटना सिद्धनकेरी (ता मंगळवेढा) येथील सुपनर वस्तीवर रविवारी घडली. सुरेखा संजय कोरे (२५) व श्रावणी संजय कोरे (१) अशी मृतांची नावे आहेत.      


सुपनर वस्तीवरील संजय नागनाथ कोरे याचे २०१२ मध्ये कोरवली येथील सुरेखाशी लग्न झाले. लग्नानंतर त्यांना २ मुली झाल्या. पहिल्या मुलीच्या जन्मानंतर संजय पत्नीच्या चारित्र्यावर  संशय घेत होता. त्यामुळे सुरेखा ३ महिने माहेरी होती. आठवड्यापूर्वी ती परत आली होती. रविवारी रात्रीसाडे आठ वाजता जेवताना संजयने सुरेखाच्या डोक्यात पहारेचा घाव घातला व जवळच असलेल्या वर्षभराच्या श्रावणीचा गळा दाबून खून केला. घरातील ३ पाळलेल्या मांजरांनादेखील पहारीने मारून संजयने मारून टाकले. नंतर स्वतःच गावात जाऊन गप्पा मारत बसलेल्या लोकांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी संजयला अटक केली आहे. मृत सुरेखाच्या नातेवाइकांनी सासू व सासऱ्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव निर्माण झाला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर  सिद्धनकेरी येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...