आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Will Not Tolerate Incitement By Politicians: Ajit Pawar On Toll Stir

तोडफोड संस्कृती खपवून घेणार नाही : अजित पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘एखाद्या पक्षाचे नेते भावना भडकावून जर लोकांना तोडफोड करण्यास सांगत असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. तोडफोड संस्कृती पुरोगामी महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही,’ असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता दिला. ज्यांना कोणाला टोलनाक्यांबद्दल प्रश्न असतील त्यांनी लोकशाही पद्धतीने प्रश्न मांडावेत, असे पवार म्हणाले.

ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. ‘टोल मागणार्‍यांना तुडवण्याचे आदेश देणार्‍यांविरुद्ध कारवाई करण्याची हिंमत सरकार दाखवणार का?’, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता पवार म्हणाले, कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात माहिती घेतली जात आहे. टोलसंदर्भातली रोजची माहिती टोल नाक्यावर जनतेला दाखवण्याच्या सूचनाही टोलवसुली करणार्‍यांना दिल्या आहेत.

टोलचे धोरण पंधरा वर्षांपूर्वी राज्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. बारामती नगरपालिकेची आर्थिक ताकद लक्षात घेता फार मोठय़ा प्रमाणात विकास करता येणार नाही हे सांगून जनतेला विश्वासात घेऊन टोल सुरू केला. बारामतीतील फक्त 20 टक्के लोकांना टोल भरावा लागतो. टोलच्या रकमेतून बारामतीमध्ये भरपूर विकासकामे करता आली. त्यामुळेच आसपासच्या परिसरातील लोक आता बारामतीत येऊन राहण्यासाठी उत्सुक असतात, असे उदाहरण अजित पवारांनी दिले.