आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wing Commander Prashant Joshi From Pune Who Died In Aircraft Of Army

हवाई दल विमान अपघातातील मृतांत पुण्याच्या विंग कमांडर प्रशांत जोशींचा समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- वायुसेनेचे एक हजार कोटींचे ‘सी 130 जे सुपर हर्क्युलस’ या मालवाहू विमानाला काल झालेल्या अपघातात पाच जवानांचा मृत्यू झाला. त्यात दोन विंग कमांडर, दोन स्क्वॉड्रन लीडर आणि एका वारंट अधिकार्‍याचा समावेश आहे. मृतात पुण्यातील विंग कमांडर प्रशांत जोशी यांचा समावेश आहे.
अपघातग्रस्त झालेल्या विमानाचे कॅप्टन म्हणून प्रशांत जोशी यांच्याकडे जबाबदारी होती. जोशी 1995 पासून हवाई दलात कार्यरत होते. पुण्यातील एनडीएतून त्यांनी शिक्षण घेतले होते. त्यांचे वडील अशोक जोशी हे ही निवृत्त वायुदल अधिकारी आहेत. अशोक जोशी यांचे सध्या औंधमध्ये वास्तव्य आहे.
‘सी 130 जे सुपर हर्क्युलस’ हे विमान 1 हजार तास चालविण्याचा दांडगा अनुभव जोशी यांच्याकडे होता. त्यामुळे त्यांचे लवकरच प्रमोशन होणार होते. मात्र, त्याआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला.
प्रशांत यांच्या पत्नी अनिता यासुद्धा पायलट आहेत. अनिता यांनी काही काळ किंगफिशरमध्ये नोकरी केली मात्र अलीकडेच त्यांनी कौटुंबिक जबाबदारीमुळे नोकरी सोडली होती. प्रशांत जोशी यांच्यामागे पत्नी अनितासह दोन मुले आहेत. मोठा मुलगा अजिंक्य 8 वर्षाचा तर दुसरा अखिल 2 वर्षाचा आहे. आग्रा येथे हवाई दलाच्या सरकारी कॉर्टरमध्ये प्रशांत जोशी पत्नी व मुलांसह आग्रा येथे राहत होते. आज सरकारी इतमामात प्रशांत जोशी यांच्यासह इतरांवर आग्रा येथील हिंडन एअरपोर्ट बेस येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.