आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RTI मधून खुलासा: केवळ चार ओळींच्‍या CV वर गजेंद्र चौहान झाले FTII अध्‍यक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - येथे असलेल्‍या फिल्म अॅण्‍ड टेलिव्‍हीजन इंस्टीट्यूट (FTII) च्‍या अध्‍यक्षपदी गजेंद्र चौहान यांची केवळ एका पॅ-याच्‍या CV वर निवड करण्‍याची आल्‍याची धक्‍कादायक माहिती इन्फॉर्मेशन अॅण्‍ड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीकडून माहिती अधिकारात (RTI ) देण्‍यात आली आहे. त्‍यांच्‍या नियुक्‍तीला विद्यार्थ्‍यांकडून मोठा विरोध होत असतानाच हा खुलास झाला आहे. त्‍यामुळे चौहान यांच्‍या अडचणी वाढल्‍या आहेत.
कसा आहे बायोडाटा
'गजेंद्र चौहान हे एक चांगले अभिनेते आहेत. ‘महाभारत’ या मालिकेत त्‍यांनी पांडवांची भूमिका केली होती. ती विशेष गाजली. त्‍यांनी जवळपासू १५० चित्रपट आणि ६०० टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे', या चार ओळींचा त्‍यांचा सीव्‍ही आहे.
कोणती माहिती मागितली होती
माहिती अधिकारातून गजेंद्र चौहान एज्‍युकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशनबद्दल माहिती मागितली होती. त्‍यात विचारले गेले होते की कोणत्‍या निकषाच्‍या आधारावर गजेंद्र यांना अध्‍यक्ष केले गेले होते. विशेष ज्‍यांना डावलून गजेंद्र यांची या पदावर निवड करण्‍यात त्‍या सगळ्यांचा बायोडाटा विस्‍तृत आहे. केवळ गजेंद्र यांचाच चार ओळींचा आहे.
अभिताभ , रजनीकांतला मागे सोडले
या पदासाठी चौहान यांच्यासह अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधू विनोद चोप्रा, राजू हिरानी, जया बच्चन, अडूर गोपालकृष्णन, रमेश सिप्पी, गोविंद निहलानी आणि आमिर खान अशा ख्‍यातकीर्त नावांचाही विचार करण्यात आला होता. मात्र, शासनाने चौहान यांची निवड केल्‍याची माहिती माहिती अधिकारातून देण्‍यात आली आहे.
अनेकांनी केला विरोध
गजेंद्र यांना या पदावर हटवावे अशी मागणी विद्यार्थ्‍यांसह अनेकांनी केली. यामध्‍ये अभिनेता अनुपम खेर, ऋषी कपूर, रणबीर कपूर, सलमान खान यांच्‍यासह काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचाही समावेश आहे.