आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात सर्वत्र भरली बिनदप्तराची शाळा, राज्यभरात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दप्तराच्या ओझ्याने वाकलेल्या विद्यार्थ्यांनी राज्यभरात शनिवारी दप्तराविना शाळा अनुभवली. दिवसभर विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनीही वाचनाचा आनंद घेतला आणि माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ‘वाचन प्रेरणा दिवसा’ला राज्यात शतप्रतिशत प्रतिसाद मिळाल्याचा दावा शिक्षण विभागाने केला असला तरी सविस्तर आकडेवारी सोमवारी जाहीर केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.
डॉ. कलाम यांच्या स्मृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक-शिक्षकांनी १५ ऑक्टोबर हा दिवस ‘वाचन प्रेरणा दिवस’ म्हणून साजरा करावा आणि अधिकाधिक पुस्तकांचे वाचन करावे, असे आवाहन करण्यात आले होते. शिक्षण विभागाने तसा जीआर काढून राज्यभरातील शाळांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. तसेच विद्यार्थ्यांना हा दिवस दप्तराच्या ओझ्याविना मिळावा, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार शनिवारी सकाळच्या व दुपारच्या दोन्ही सत्रांत भरणाऱ्या सर्व शाळांमधून ‘वाचन प्रेरणा दिवस’ उत्साहाने साजरा करण्यात आला, अशी माहिती विद्या परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांनी दिली.
उपक्रम शंभर टक्के यशस्वी झाला
^डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जपण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांनीही वाचन करून वाचन प्रेरणा दिन साजरा केला. वाचन प्रेरणा दिवशी राज्यात २० कोटी पुस्तकांचे वाचन व्हावे, असे ठरवण्यात आले होते. वाचनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता हे उद्दिष्ट साध्य झाले, असे म्हणता येईल. उपक्रम शंभर टक्के यशस्वी झाला आहे. मात्र, आकडेवारी सोमवारी उपलब्ध होईल.
गोविंद नांदेडे, राज्य विद्या परिषद संचालक
बातम्या आणखी आहेत...