आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Without Congress Government Step Down Youth Future In Dark Pankaja Palve

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉँग्रेस आघाडी सरकार उलथवल्याशिवाय तरुणांचे भविष्य असुरक्षितच - पंकजा मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - ‘तरुणांच्या हक्काचा पैसा भ्रष्टाचारात खाऊन भूक, बेरोजगारी, गुन्हेगारी लादणारे कॉँग्रेस आघाडी सरकार उलथवल्याशिवाय तरुणांचे भविष्य सुरक्षित राहणार नाही. हे सरकार घालवण्यासाठी तरुणांनी आम्हाला साथ द्यावी,’ असे आवाहन भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) प्रदेशाध्यक्षा आमदार पंकजा मुंडे-पालवे यांनी शुक्रवारी केले. मत विभाजन करणार्‍या पक्षांच्या मागे जाऊन तरुणांनी मते वाया घालवू नयेत, असे आवाहनही त्यांनी ‘मनसे’चे नाव न घेता केले.

‘कॉंग्रेस आघाडी सरकारविरुद्धचा एल्गार’ या भाजयुमोच्या राज्यव्यापी कार्यक्रमाचा प्रारंभ पुण्यात झाला, यावेळी त्या बोलत होत्या. भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अनुराग ठाकुर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरातून सुरु झालेल्या एल्गार कार्यक्रमाला तरुणांनी उत्स्फूर्त गर्दी केली होती. रंगमंदिर खचाखच भरल्यामुळे शेकडो तरुणांनी बाहेर लावलेल्या ‘स्क्रीन’वरुन वक्त्यांची भाषणे ऐकली.

पंकजा पालवे यांच्या सुमारे तासभराच्या भाषणाला तरुणांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. त्या म्हणाल्या, ‘कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागे लागून तरुणांनी आपले भविष्य धोक्यात घालू नये. तरुणांच्या रोजगार आणि शिक्षणावर निधी खर्च करण्याऐवजी कॉँग्रेस आघाडी सरकारने कोट्यवधींचा भ्रष्टाचार केला. काहीही केले, कसेही वागले तरी जनता आम्हालाच निवडून देत असल्याचा अहंकार सत्ताधार्‍यांमध्ये आहे. तो मोडून काढण्याचा निर्धार युवा वर्गाने केला पाहिजे.’


आम्हाला संघर्षाचा वारसा
पुण्यातील भाजयुमो कार्यकर्त्यांनी तलवार देऊन पंकजा पालवे यांचा सत्कार केला. त्याचा संदर्भ देत त्या म्हणाल्या, ‘तलवार हाती असल्याशिवाय बीड जिल्ह्यात रोजचे राजकारणच करता येत नाही. कोणावर वार करण्यासाठी नाही तर स्वत:च्या संरक्षणासाठी तलवार वापरावी लागते. आम्हाला संघर्षाचाच वारसा आहे, सत्तेचा नाही. जनतेत मिसळून, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होऊन काम करण्याची आमची परंपरा आहे. जनतेने आम्हाला ताकद द्यावी.’

महागाईमुळे जनतेचे जगणे मुश्कील : ठाकूर
‘प्रामाणिकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीच देशाच्या इतिहासातील सर्वाधिक भ्रष्ट आणि नाकर्ते सरकार दिले. अर्थशास्त्रज्ञ असलेल्या मनमोहनसिंग यांच्या काळातच महागाईमुळे सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील झाले,’ असा आरोप खासदार ठाकूर यांनी केला.