आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Without Sprinkale Irragation Sugar Cane Factory Not Starts Prithiviraj Chavan

ठिबकचा अवलंब न करणा-या साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही - पृथ्‍वीराज चव्हाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - उसासाठी ठिबक सिंचन अनिवार्य ठरणार आहे. ठिबक सिंचनाचा अवलंब न करणा-या साखर कारखान्यांना गाळप परवाना मिळणार नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी येथे केले. येत्या तीन वर्षांत शंभर टक्के ऊस ठिबक सिंचनावर गेला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.


गोखले इन्स्टिट्यूटतर्फे आयोजित राज्यातील जलसंपत्ती विकासविषयक चर्चासत्रात ते बोलत होते. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, जलसंधारण राज्यमंत्री नितीन राऊत, संस्थेचे संचालक डॉ. राजस परचुरे, राज्य नियोजन मंडळाचे माजी सदस्य डॉ. एच. एम. देसरडा या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सर्व्हंट्स सोसायटी ऑफ इंडियातर्फे एक लाख रुपये निधी देण्यात आला.


राज्यात केवळ 18 टक्के जमीन सिंचनाखाली आहे, असे सांगून चव्हाण म्हणाले, उजनी धरणासाठी 1500 कोटी रुपये खर्च झाले. त्याआधी सोलापूरमध्ये दूध व साखर कारखाने नव्हते. आता जिल्ह्यात 28 साखर कारखाने आहेत, पण धरण काही या कारखान्यांसाठी बांधलेले नाही. यापुढे सर्वच धरणांच्या पाणी नियमनाचा स्वतंत्र व्यवस्थेद्वारा विचार करणे गरजेचे झाले आहे. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, जादूटोणा विधेयक मंत्रिमंडळाने मंजूर केले आहे. पावसाळी अधिवेशनात हे विधेयक संमत केले जाईल. नागरिकांना चढ्या भावाने भाजीपाला खरेदी करावा लागत आहे, यावर पणन विभागाने आराखडा तयार करून अंमलबजावणी केली पाहिजे. केंद्राच्या हॉर्टिकल्चर योजनांतून निधी मिळवता येईल का, याचाही विचार झाला पाहिजे. मनपा शिक्षण मंडळे बरखास्तीबाबत विचारले असता, केंद्राने कायदा लागू केल्यास तो राज्यालाही अनिवार्य असेल, असे ते म्हणाले. पश्चिम घाटासंदर्भातील माधव गाडगीळ समितीच्या अहवालावर व्यावहारिक मार्ग हवा, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.


मुख्यमंत्री असेही म्हणाले
०गावागावांत पर्जन्यमापक यंत्रे बसवून ती जोडणे
० उत्तराखंड, मुंबईने अनुभवले हवामानबदलाचे परिणाम
० आता शंभर कोटी झाडे लावण्याची योजना
० टँकरचे पाणी देऊनही झाडे वाचवण्याची गरज
० शिक्षणाचे मोजमाप फक्त गुणवत्ता याच निकषावर व्हावे