आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीकेंद्रित चित्रपटांचा खजिना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - चित्रपट महोत्सव हे प्रकरण आता सर्वांच्या परिचयाचे झाले असले तरी केवळ स्त्रीकेंद्रित चित्रपटांचा महोत्सव सातत्याने तीन वर्षे आयोजित करणार्‍या पुण्याच्या आयाम ग्रुपची दखल आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. अनेक देशी-विदेशी माध्यमांनीही या चित्रपट महोत्सवाविषयी उत्सुकता दाखवली आहे. या महोत्सवाचे उद्घाटन अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या हस्ते महिलादिनी म्हणजेच शुक्रवारी होणार आहे.

या वर्षीचा आयामचा चित्रपट महोत्सव भारतीय चित्रपटांची शताब्दी अधोरेखित करणारा आहे. महोत्सवाची सुरुवात बहुचर्चित गुलाबी गँग या चित्रपटाने करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे हे देशातील पहिले जाहीर प्रदर्शन आहे आणि आयामच्या व्यासपीठावर ते होत असल्याचा आनंद दिग्दर्शिका निष्ठा जैन यांनी व्यक्त केला आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या पौरोहित्याच्या क्षेत्रात स्त्री पुरोहितांनी केलेला प्रवेश आणि मिळवलेले यश सांगणारा लघुपट सुहासिनी मुळे यांनी तयार केला असून त्याचेही प्रदर्शन मुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती समन्वयक मनस्विनी प्रभुणे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.

महोत्सवाची दखल
र्जमन टीव्हीसारख्या आंतरराष्ट्रीय दृकर्शाव्य आणि वेब माध्यमाने या महोत्सवाचे कव्हरेज केले आहे, असे आयामच्या सदस्या प्राची बारी म्हणाल्या. पुण्यात मुद्रित, दृकर्शाव्य, वेब, प्रकाशन, संपादन अशा विविध माध्यमांत कार्यरत असणार्‍या महिला पत्रकारांचा गट ‘आयाम ग्रुप’ या नावाने गेली आठ वर्षे काम करत आहे. चार वर्षांपूर्वी आयामच्या वतीने प्रथम स्त्रीकेंद्रित चित्रपटांच्या महोत्सवाच्या आयोजनाची संकल्पना मांडली गेली. चित्रपट क्षेत्रातील तज्ज्ञ, समीक्षक, कलावंत या सार्‍यांनीच त्याला पाठिंबा दिला आणि 2010 मध्ये आयाम ग्रुपचा पहिला स्त्रीकेंद्रित चित्रपट महोत्सव मोठय़ा उत्साहात संपन्न झाला. संकल्पनेतील वेगळेपणा, आशयघन चित्रपटांची निवड, दज्रेदार लघुपट-माहितीपटांचा समावेश आणि आनुषंगिक विषयांवर संवादसत्रे यामुळे या चित्रपट महोत्सवाची दखल मोठय़ा प्रमाणात घेतली गेली होती. या महोत्सवामुळे पुणेकरांना चित्रपट पाहण्याची पर्वणी मिळणार आहे.

‘स्पर्श’सह दर्जेदार चित्रपटांची मेजवानी
आयाम ग्रुपच्या या चित्रपट महोत्सवात गुलाबी गँग, फिराक, गंगुबाई, इंग्लिश विंग्लिश, अमू, बrावादिनी, स्पर्श आणि जापनीज वाइफ यासारखे दज्रेदार चित्रपट आणि लघुपट रसिकांच्या भेटीस येणार आहेत. स्त्री दिग्दर्शिकांनी स्त्रियांच्या भावविश्वाकडे कोणत्या संवेदनशीलतेने पाहिले आहे, याचे दर्शन या महोत्सवातील चित्रपटांमधून घडवण्याचा प्रयत्न आहे, असे महोत्सवाच्या समन्वयक मनस्विनी प्रभुणे यांनी सांगितले.