आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुम्हीही लिफ्ट वापरता! मग ही बातमी तुम्ही वाचायलाच हवी.. असा गेला वृद्धेचा जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- पिंपरी चिंचवडमधील साई सोसायटीमधील लिफ्टमुळे ज्येष्ठ महिलेला आपला जीव गमवावा लागला. नीलिमा चौधरी (वय-58) असे मृत महिलेची नाव आहे. नीलिमा या दिवाळीच्या सुट्टीसाठी झारखंडहून पिंपळे सौदागर येथील मुलाकडे आल्या होत्या. 23 ऑक्टोबरला त्या लिफ्टमधून निघाल्या असता तिथेच त्यांचा मृत्यू झाला.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, नीलिमा चौधरी या आपल्या मुलाकडे दिवाळीसाठी आल्या होत्या. 23 ऑक्टोबरला नातूला त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. नातूला आणि त्यांच्या नातेवाइकाला लिफ्टमधून खाली सोडले. परंतु घरात पर्स आणि मोबाइल राहिल्याने त्या परत लिफ्टने सातव्या मजल्यावर आल्या. मोबाइल आणि पर्स घेऊन जात होत्या. लिफ्टचे बटण दाबले लिफ्टवर न येता केवळ लिफ्टचा दरवाजा उघडला याची भनक पण न लागल्याने त्या लिफ्ट दरवाज्याच्या आत गेल्या. पण लिफ्ट मात्र खालीच होती त्यामुळे आत पाऊल टाकताच सातव्या मजल्यावरून पहिल्या मजल्यावर असलेल्या लिफ्टच्या वर कोसळल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

 

नीलिमा चौधरी यांची सून पद्मिनी हिने लिफ्टमध्ये बिघाड होता, यामुळे त्यांच्या सासूचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. जबाबदार व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे असा पवित्रा नीलिमा चौधरी यांच्या कुटुंबियांनी घेतला आहे. मात्र, पीडब्लूडीकडून अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. अहवाल दोन तीन दिवसात येणे अपेक्षित आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसात तक्रार दिली आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...