आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिंपरी चिंचवडमध्ये स्वाइन फ्लूने महिलेचा मृत्यू; आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पिंपरी चिंचवड येथे स्वाइन फ्लूने एका 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. शहरात स्वाइन फ्लूने जानेवारीपासून आतापर्यंत 33 जणांचा मृत्यू झाला आहे. या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ही महिला हिंजवडी येथे राहत होती. 
 
स्वाइन फ्लूची लक्षणे 
स्वाइन फ्लूची लक्षणे ही सर्व साधारण फ्लूसारखीच असतात. यात थंडी, ताप 100 अंश फॅ. पेक्षा जास्त सर्दी, खोकला, घसादुखी, अंगदुखी, पोटदुखी, मळमळ, उलटी, जुलाब व कधी कधी पोटदुखी इत्यादी लक्षणांचा समावेश असतो.
 
फ्लू किंवा साधी सर्दी फरक कसा ओळखाल
फ्लू किंवा साधी सर्दी ओळखण्यासाठी एक खूण आपणास उपयोगी पडते. आपणास फ्लूची लक्षणे सर्दीच्या लक्षणांच्या काही काळ अगोदर दिसतात. तसेच ही लक्षणे अधिक तीव्र स्वरुपाची असतात. जर फ्लू झाला असेल तर आपणास 2 ते 3 आठवडे सतत अशक्तपणाचा आभास होत राहतो. तसेच नाक सतत बंद राहते किंवा वाहत राहते, डोकेदुखी व घसादुखी येते.
 
स्वाइन फ्लूचा प्रसार कसा होतो?
स्वाइन फ्लू विषाणू बाधित व्यक्तीच्या खोकण्याने किंवा शिंकण्याने हवेत उडणाऱ्या तुषारातील विषाणू धूलिकणावेष्टीत स्वरुपात जिवंत राहतात. श्वसन करताना नाकातून किंवा तोंडावाटे याचा संसर्ग होऊ शकतो. तसेच अशा बाधित व्यक्तीच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे बाहेर निघणाऱ्या कफ हातावर लागल्यास त्यानंतर तो व्यक्ती जिथे जिथे स्पर्श करेल तिथे तिथे हा संसर्ग होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...