आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेवर कु-हाडीने 9 वार, प्रेम संबंध ठेवण्‍यासाठी केली जबरदस्‍ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी चिंचवड- कासारवाडी येथे कामावर जात असताना महिलेवर तिच्या प्रियकराने कु-हाडीने सुमारे 9 वार केले. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना आज (रविवार) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. मनिषा चव्हाण (वय 35 रा. कासारवाडी) असे महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात त्‍यांनी तक्रार दिली आहे. 
 
मनिषा चव्‍हाण यांनी पोलिसांना माहिती दिली की, 'आज सकाळी कामावर जात असताना आरोपी सुभाष लांडगे याने त्‍यांच्‍यावर कु-हाडीने वार केले. आरोपी हा मनिषा यांच्‍या नव-याचा मित्र आहे. तो प्रेम संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. मात्र नकार दिल्यामुळे त्‍याने कु-हाडीने वार केले.'
 
घटनास्थळी भोसरी पोलीस पोहचले असून आरोपी फरार झाला आहे. महिलेवर पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्‍यांची प्रकृती आता स्थिर आहे. पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...