आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Revenue Officer Gets 2 Years In Prison For Taking Bribe

लाचखोरीत सापडलेल्या महिला भूमापन अधिका-यास दोन वर्षाची शिक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- भोसरी येथील एका जमिनीची मोजणी करून त्याचे डीमार्केशन करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेल्या महिला अधिका-यास कोर्टाने दोन वर्षे कारावास व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
सुनीता संजय पठारे असे आरोपीचे नाव असून त्या पिंपरी-चिंचवड येथील नगर भूमापन कार्यालयात परिरक्षण भूमापक पदावर कार्यरत होत्या. विशेष न्यायाधीश के. चांदवाणी यांनी या प्रकरणात पठारे यांच्यासह त्यांच्या वतीने लाच स्वीकारणारा शंकर रघुनाथ जाधव या खासगी व्यक्तीसही एक वर्ष कारावास दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
तक्रारदाराच्या अर्जानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 15 एप्रिल 2014 रोजी सापळा रचून आधी जाधव यांना त्यांच्या कबूली जबाबावरून पठारे यांना अटक केली होती. त्यांच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याप्रमाणे सदर दोघांना दोषी ठरवून न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली.
लेखापरीक्षकाची फसवणूक
औरंगाबादयेथील लेखापरीक्षक उल्हास जोशी (वय 50, रा. टिळकनगर) यांच्याकडून पुण्यातील एका व्यक्तीने 28,303 रुपये लेखापरीक्षण शुल्क घेतले, मात्र बनावट चलन तयार करून ही रक्कम लाटली.
या प्रकरणी जोशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून समर्थ पोलिस ठाण्यात गणेश आत्माराम माडवे (रा. कोंढवा, पुणे) या आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन 2007 ते 2012 दरम्यान नमूद आरोपीने जय शिवसमर्थ नागरी पतसंस्थेतील व्यवहारात त्यांची फसवणूक केली.