Home | Maharashtra | Pune | woman teacher abused by vice principal in collage

15 दिवसांपूर्वी दिली वस्तू भेट; त्यानंतर प्रयोगशाळेत बोलवून शिक्षिकेसोबत केले असे काही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 10, 2017, 05:35 PM IST

मांजरी भागातील के. के.घुले महाविद्यालयातील एका शिक्षिकेचा उपमुख्याध्यापकांनी विनयभंग केल्याने संशयित आरोपीस हडपसर...

 • woman teacher abused by vice principal in collage
  पुणे- मांजरी भागातील के. के.घुले महाविद्यालयातील एका शिक्षिकेचा उपमुख्याध्यापकांनी विनयभंग केल्याने संशयित आरोपीस हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. या महाविद्यालयात पीडित शिक्षिका 2013 पासून कार्यरत आहे.
  आधी दिले घडयाळ भेट मग केले असे
  मागील 4 महिन्यांपासून उपमुख्याध्यापक सुरेश पांडुरंग सावंत हे आपल्याकडे वाईट नजरेने पाहत होते, असा या महिलेचा आरोप आहे. पंधरा दिवसांपूर्वी शाळा सुटल्यावर त्यांनी पीडित शिक्षिकेला घड्याळ भेट दिले. त्यानंतर काही दिवसांनी शाळेतील प्रयोगशाळेत बोलवून विनयभंग केल्याचा उल्लेख महिलेने तक्रारीमध्ये केला आहे.
  महाविद्यालयातील इतर महिलांसोबत घडला असा प्रकार?
  पीडित शिक्षेकेने हा सर्व प्रकार सहकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. तेव्हा इतर महिला सहकाऱ्यांसोबतही असा प्रकार घडल्याचे पीडितेला समजले. परंतु, नोकरी जाण्याच्या भीतीने एकाही महिलेने या प्रकाराची तक्रार केली नव्हती, असा दावा पीडितेने केला आहे. दरम्यान, महिलेने दिलेल्या तक्रारीमध्ये कितपत तथ्य आहे, याचा पोलिस तपास करत आहेत.

Trending