आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यात महिलेची बाळासकट रेल्वे पुलावरुन नदीत उडी मारून आत्महत्या; बालकाचा शोध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- दापोडीच्या हरीस पुलावरून महिलेने बाळासह नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) दुपारी घडली. महिलेचा मृत्यू झाला असून बालकाचा शोध सुरु आहे. शहापुरी असलम शेख (वय-20, रा. वाकड) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीच्या हरिस रेल्वे पुलावरून महिलेने बाळासह नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी महिलेचा मृतदेह बाहेर काढला. परंतु बालकाचा शोध सुरु आहे.

 

या महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले असावे, हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा.. संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...