आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Women Participation And Expectations In Maharashtra Politics

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रातील राजकारण आणि महिलांचा सहभाग (दिव्य मराठी ब्लॉग)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणातील महिलांचा सक्रीय भाग हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. हा सहभाग दोन पातळ्यांवर बघितला जाऊ शकतो, एक म्हणजे प्रत्यक्ष सहभाग घेऊन निवडणूक लढवणे आणि दुसरं म्हणजे मतदानप्रक्रियेत सहभाग घेणे. वरवर पाहता दोन्ही प्रक्रियेत हा सहभाग तसा मोठ्या प्रमाणावर आढळून येत नाही.
यावेळच्या विधानसभा निवडणूकीत महिला उमेदवारांची संख्या हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखी आहे. कोणत्याही निवडणूकीतील मतदानातील टक्केवारीचे प्रमाण काढताना तरूणांप्रमाणे महिलादेखील महत्वाचा घटक समजल्या जातात. लोकसभा 2014 च्या निवडणूकीत सगळ्यांनीच मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, 2009 मधील निवडणूकीतील मतदानापेक्षा यावेळची मतदान टक्केवारी 10 टक्क्यांनी जास्त होती.
काही दिवसांपुर्वी यशस्वीरित्या पार पडलेल्या मंगळयान मोहिमेनंतर असं, 'क्वार्ट्झ' या वेबसाईटनुसार, इस्त्रोमध्ये काम करणाऱ्या वैज्ञानिकांमध्ये 20 टक्के महिला आहेत. ही गोष्ट कौतुकास्पद असली तरीही या आकड्यांत वाढ व्हावी असेच कोणालाही वाटेल. आज सर्वच क्षेत्रात महिला यशस्वी होत आहेत, परंतू अनेक महिला अजूनही या सगळ्या यशापासून खुप दूर आहेत. त्यासाठी आजही महिला सबलीकरणाची गरज देशाला तसेच राज्याला आहे. अनेक ठिकाणी महिलांना समाजात तसेच घरात योग्य सम्मान मिळत नाही. मोलमजूरी करून आपलं पोट भरणाऱ्या महिलांची संख्या भरपूर आहे. शालेय, महाविद्यालयीन मुली असो अथवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, सर्वांनाच विविध समस्यांचा सामना करावा लागतो. महिला सुरक्षा हा सध्या खुप महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच अनेक महिला आजदेखील शिक्षणापासून वंचित आहेत. काहींना शिक्षण असूनसुद्धा कामाची योग्य संधी मिळत नाही. अशा वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी शासनाची बऱ्याच प्रमाणात मदत होऊ शकते.
येत्या विधानसभा निवडणूकीत पुन्हा एकदा राजकीय स्थित्यंतर होणार निश्चितच आहे. प्रत्येक पक्ष प्रत्येक निवडणूकीच्या वेळी महिलांसाठी विविध योजना राबवत असतात. यावेळी पाच पक्षांचे पाच वेगळे जाहीरनामे निघतील. प्रत्येत जाहीरनाम्यात महिलांविषयी काही ना काही धोरण नक्कीच राबवले जाणार.नवीन येणाऱ्या सरकारकडून महिलांच्या काय अपेक्षा आहेत, त्यांचे एकूणच राजकारणाबद्दल असलेले मत जाणून घेण्याचा हा प्रयत्न...
"माझ्या दृष्टीने दारूबंदी ही सगळ्यात मोठी समस्या आहे. नवऱ्याच्या व्यसनामुळे अनेक स्त्रियांना खुप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारने आपल्याकडे दारूबंदी करायला हवी. जर संपुर्ण देश व्यसनमुक्त झाला तरच प्रगती होईल आणि आपण समृद्ध होऊ."- अरुणा बांडगे, औरंगाबाद
"कोणतेही सरकार आले तरी 'टाऊन प्लानिंग'चा विचार व्हायला हवा. पुढच्या 10-15 वर्षात शहराच्या गरजांचा विचार करून आत्तापासून तयारी करायला पाहिजे. शहरात सगळीकडे स्वच्छता असायला पाहिजे. त्याकरिता लोकांमध्ये जागृती निर्माण व्हायला हवी. रस्त्यावर ठिकठिकाणी स्वच्छता ठेवण्याचे आव्हान करणारे डिसप्ले बोर्डस् लावले गेले पाहिजेत. त्यामुळे आपोआपच लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण होईल. यावेळी सरकारने नुसती आश्वासने न देता काहीतरी करून दाखवावं." -धनश्री मुळे, औरंगाबाद
"मला वाटतं जर भाजपचं सरकार आलं तर सामान्य माणसांचे बरेचसे प्रश्न सुटतील. पेन्शनसारखी सरकारी कामे लवकरात लवकर व्हायला हवीत." - प्रमोदिनी दिक्षीत, औरंगाबाद