आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाचास कंटाळून नगरच्या विवाहितेची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून नगरच्या एका विवाहितेने रॉकेलने पेटवून घेत आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली. मनीषा सारोक्ते (22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मनीषाचा पती संजय सखाराम सारोक्ते (26), शरद सखाराम सारोक्ते (29) यांना अटक केली असून सुनीता सखाराम सारोक्ते व विठ्ठल सखाराम सारोक्ते (रा. कोहणे, ता. अकोले, जि.नगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मनीषाचे वडील बाबू सोमा लांडे (रा.कोहणे, जि.नगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. मनीषा हिचा संजय याच्याशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यानंतर पती, दीर व सासू यांनी पैशांच्या कारणावरून छळ सुरू केला. त्यामुळे सततच्या त्रासाला कंटाळून तिने रॉकेलने पेटवून घेतले.