आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी झाल्याने सासरी छळ; औरंगाबादच्या महिलेने पुण्यात गळफास घेतला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- मुलगी झाली म्हणून सासरच्या लोकांकडून होणार्‍या सतच्या छळाला कंटाळून औरंगाबादच्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पूजा सागर वरतले (26) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी पूजाचे वडील सोमनाथ सोनवणे यांनी तिचा पती सागर गोरखनाथ वरतले, सासू सुनिता गोरखनाथ वरतले व दीर हरीश गोरखनाथ वरतले (सर्व रा. मांजरी, पुणे) यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पूजा व सागर यांचा डिसेंबर 2010 मध्ये विवाह झाला. त्यानंतर त्यांना पहिली मुलगी झाली. या कारणावरून पतीसह सासरच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला होता. या त्रासाला कंटाळून तिने पुण्यातील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.