आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Work Shop On Dr.Babasaheb Ambedkar In Ralegaonsiddhi

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर राळेगणसिद्धीत कार्यशाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रजत जयंतीनिमित्त येत्या गुरुवारी (१४ एप्रिल) राळेगणसिद्धी येथे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 'अर्थविचार’ या विषयावर कार्यशाळा होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सकाळी ११ वाजता या कार्यशाळेचे उद्घाटन करणार आहेत. अर्थक्रांती जनसंसदेतर्फे आयोजित या कार्यशाळेत डॉ. आंबेडकर यांच्या आर्थिक विचारांवर मंथन होणार आहे. या विषयावर प्रसिद्ध होत असलेल्या 'अर्थपूर्ण' मासिकाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही हवी होती एक अर्थक्रांती’ या विशेषांकाचे प्रकाशन या वेळी अण्णा हजारे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यशाळेला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अर्थक्रांती जनसंसदेचे अशोक सब्बन आणि प्रभाकर कोंढाळकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९४२२०८३२०६, ९४२२०३१८२५ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.