आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे: बडतर्फ कामगाराने केला कंपनीतील मॅनेजरचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- वारंवार पैसे मागून त्रास व धमक्या दिल्यामुळे कामावरून काढल्याचा राग मनात धरून कामगाराने कंपनीतील मॅनेजरचा तलवारीने भोकसून खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी येथे घडली.
बालाजी भानुदास बिरादार ( 36, रा. वैभव कॉलनी, विजयनगर, काळेवाडी) असे खून झालेल्या अभियंता मॅनेजरचे नाव आहे. तर दत्ता आमले (20, रा. कान्हे फाटा, वडगाव) याला पोलिसांनी अटक केली आहे. आमले याच्याविरोधात बिरादार यांच्या पत्नी वर्षा बिरादार यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजी बिरादार हे कान्हे फाटानजीकच्या टाकवे बुद्रुक येथील बेरॉक कंपनीत प्रॉडक्शन विभागात मॅनेजर म्हणून काम पाहत होते. त्यांच्याच विभागात दत्ता आमले हा हंगामी कामगार म्हणून कामाला होता. आमले हा गुंड प्रवृत्तीचा असल्याने तो स्वत: काही काम करीत नसे व इतर कामगारांनाही दमदाटी करायचा. आमलेने दोन महिन्यापूर्वी बिरादार यांना वारंवार पैसे मागितले होते. बिरादार यांनी पैसे न दिल्याने त्याने त्यांच्याशी दमदाटी करीत वाद घातला होता. या घटनेनंतर बिरादार यांनी पोलिसांत तसेच कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली होती.
बिरादार यांच्या तक्रारीची दखल घेऊन कंपनीने दत्ता आमलेला कामावरून काढून टाकले होते. त्यामुळे आमले बिरादार यांना फोन करून तुझ्यामुळेच मला कंपनीतून टाकून टाकल्याचे सांगायचा. तसेच बघून घेईन असा धमक्या देत असायचा.
शनिवारी रात्री बिरादार दुस-या पाळीतील काम संपवून रात्री 12 च्या सुमारास काळेवाडीतील आपल्या घराजवळ कंपनीच्या बसमधून उतरले. त्याचवेळी तेथील एका कॉलनीत दबा धरून बसलेल्या आमलेने बिरादार यांच्यावर तलवारीने हल्ला केला. बिरादार यांच्या खांद्यावर, मानेवर व पोटावर तलवारीने जबरी वार केले. त्यावेळी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. बिरादार यांना रूग्णालयात दाखल केले मात्र त्यांचा तत्काळ मृत्यू झाला होता. घटनेनंतर आमले पसार झाला होता. मात्र, वाकड पोलिसांनी त्याला रविवारी सकाळी अटक केली.
बातम्या आणखी आहेत...