आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Environment Day Pune Gurav Mala Hand Pump Issue

पर्यावरण दिन विशेष: गुरवमळ्यात सौर हातपंपांची किमया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- ड्युएल पंपिंग सिस्टिमवर चालणार्‍या सौर हातपंपांमुळे पुण्यापासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरचे गुरवमळा हे छोटे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. उपलब्ध पाण्याचे विकेंद्रीकरण केल्याने दरडोई गरजेनुसार पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. एकाच वेळी खर्च करून पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असल्याची भावना गावकर्‍यानी व्यक्त केली.

पुण्यापासून अहमदनगरकडे तळेगाव ढमढेरेजवळचे गुरवमळा गाव अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करत होते. खरे तर गावची वस्ती जेमतेम पाचशेच्या आसपास, पण यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या गावातही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर होता. त्यावर उपाय म्हणून सुचवण्यात आलेला सौर हातपंपांचा पर्याय गावकर्‍यानी एकमताने स्वीकारला.

पाण्याचा वापर करताना अतिरिक्त पाणी वाया जाऊ नये, यासाठी आपोआप बंद होणारा-उघडणारा स्तरनियंत्रक (लेव्हल कंट्रोलर) हे या सौर हातपंपाचे वैशिष्ट्य आहे. ड्युएल पंपिंग मॉडेलमुळे देखभालीचा खर्चही कमी होतो. सकाळच्या वापरानंतर दिवसभर पंपाला सौर ऊर्जा मिळते आणि त्यावर सायंकाळनंतरही पंप सुरू राहतो. गावातील गरज भागल्यानंतर अतिरिक्त पाण्याचा वापर सार्वजनिक नळकोंडाळ्यासाठी करण्यात आला. गुरवमळा गावाच्या आसपासच्या गावातील महिलाही येथील पंपांवरून पाणी भरतात.

500 रूपयांत पाणी
गावात आता प्रत्येक घरात स्वच्छतागृह आहे. (एका अहवालानुसार देशात फक्त 14 टक्के लोकसंख्येकडे स्वतंत्र स्वच्छतागृह आहे.) याठिकाणी फक्त पाचशे रुपयांत पाइपलाइनद्वारे थेट घरात पाणीपुरवठा शक्य झाला आहे.