आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • World Environment Day Vasundhara Festival In Six State

वसुंधरा महोत्सव सहा राज्यांत; सोलापूरमधून प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात येणारा वसुंधरा महोत्सव यावर्षी सहा राज्यांत 28 शहरांमधून आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवाची सुरुवात 18 जुलैपासून सोलापूरपासून होणार आहे. यंदा प्रथमच महोत्सवाच्या जोडीने पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनही आयोजित करण्यात येणार आहे. तसेच स्थानिक पर्यावरणाशी संबंधित अशी पाणी पंचायतदेखील घेतली जाणार आहे.
महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गुजरात या राज्यांत यंदा महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.