आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Worlds Largest Helstone Recorded In Ratnagiri District

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात मोठ्या हेलस्टोनची नोंद रत्नागिरी जिल्ह्यात, किरणकुमार जोहरे यांचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - जगातील सर्वात मोठी, जड आणि सर्वाधिक परिघाची गार (हेलस्टोन) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे नोंदवली गेली असल्याचा दावा येथील पदार्थविज्ञान संशोधक किरणकुमार जोहरे यांनी केला.


ही गार (हेलस्टोन) 50 किलोहून अधिक वजनाची, 53.35 सेंटिमीटर व्यासाची तर 156.06 सेंटिमीटर परिघाची आहे. वजन, व्यास आणि परिघाच्या दृष्टीने ही जगातील सर्वात महाकाय गार म्हणून नोंदली गेली आहे.


लांजा येथील पालू-नामेवाडी परिसरात 3 ऑक्टोबर 2010 रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास ही महाकाय गार कोसळली होती. त्यामुळे 3 फूट खड्डा तयार झाला. या गारेचे संशोधन, माहिती, विश्लेषण करून त्याविषयीचा शोधनिबंध किरणकुमार जोहरे यांनी नॅशनल फिजिक्स असोसिएशनमध्ये (मार्च 2012) प्रसिद्ध केला. तसेच या संशोधनाची माहिती वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, नॅशनल ओशनिक अ‍ॅटमोस्पिअरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, नॅशनल क्लायमेट डाटा सेंटर, मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्सेस तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी अशा महत्त्वाच्या संस्थांकडे पाठवली होती. इतक्या प्रयत्नांनंतर आता सर्वात मोठ्या हेलस्टोनचा विक्रम देशाच्या नावे झाला आहे.


जोहरे म्हणाले, ही गार कोसळली तेव्हा मान्सून अधिकृतरीत्या संपलेला होता. पण त्या दिवशी मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट, वेगाने वाहणारे वारे यांचा झंझावात सुरू होता. पाठोपाठ ढगफुटी होऊन एका तासात शंभरहून अधिक मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. विदर्भ, कोकण, आंध्र प्रदेश आणि उत्तराखंड येथे नुकतीच झालेली ढगफुटी यादृष्टीने संशोधनासाठी महत्त्वाची आहे.


याविषयीचा शोधनिबंध, माहिती, विश्लेषण वर्ल्ड मेट्रॉलॉजिकल ऑर्गनायझेशन कमिटीसमोर विचारार्थ ठेवण्यात येईल, अशी माहिती नॅशनल क्लायमेटिक डाटा सेंटरचे सॅम मॅकॉऊ यांनी दिली.


अशी होती महाकाय गार
* 50 किलोंहून अधिक वजन
* 53.34 सेंटिमीटरचा व्यास
* 156.06 सेंटिमीटरचा परीघ
* रत्नागिरीतील लांजा येथे कोसळली
* यापूर्वीचे विक्रम किरकोळ वजन, व्यास, परिघाचे आहेत.