आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Write New Shiva Autobiography; Dr. A H Salukhe Urges Multiligual Community

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिवचरित्राचे नव्याने लेखन करा ; डॉ. आ. ह. साळुंखे यांचे बहुभाषाकोविदांना आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात होता कुशल प्रशासक, बहुजनांचा कैवारी आणि चाणाक्ष मुत्सद्दी. महाराजांच्या या पैलूंवर प्रकाश टाकणा-या नव्या शिवचरित्राचे लेखन करण्याची गरज ज्येष्ठ विचारवंत आणि पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे यांनी येथे मांडली. केवळ जयजयकाराचे नारे लावून महाराज समजणार नाहीत आणि युवा पिढीपर्यंत पोहोचणारही नाहीत. त्यासाठी विविध भाषांतील पंडित, संशोधकांनी एकत्रित येऊन शिवचरित्राचे शिवधनुष्य पेलले पाहिजे, असे ते म्हणाले. पुणे महापालिकेतर्फे आयोजित पहिल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य संमेलनाचे उद्घाटन महापौर वैशाली बनकर यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. साळुंखे अध्यक्षपदावरून बोलत होते.

जगभरातील विविध राजकीय विश्लेषक, योद्धे, मुत्सद्दी, विचारवंत, प्रवासी आणि भाष्यकार तसेच इतिहासकारांनी शिवाजी महाराजांचे वर्णन करून ठेवले आहे. आज पाच-दहा वर्षांतच काळ बदलला असे म्हणता येते, पण शिवचरित्र आजही कालबाह्य झालेले नाही. समाजात अनेक सज्जन माणसे असतात, तरीही शोषण का होते, हा अनुत्तरित प्रश्न आहे. प्रा. रतनलाल सोनग्रा, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, स्वागताध्यक्ष रवींद्र माळवदकर, शरद गोरे, दशरथ यादव आदी या वेळी उपस्थित होते.

...तर शिवचरित्र लेखनास 25 जन्मही पुरणार नाहीत
शिवाजी महाराजांमध्ये शील आणि सामर्थ्य यांचा दुर्मिळ संगम होता. मात्र, महाराजांचे चरित्र लिहिताना केवळ भावव्याकुळ राहून उपयोगी नाही. त्यातून प्रेरणा घेतली पाहिजे. केवळ भावनिक आंदोलनांना अर्थ नाही. समग्र शिवगुणांचा अभ्यास करून एकाच व्यक्तीने शिवचरित्र लिहायचे म्हटल्यास 25 जन्मही पुरणार नाहीत. त्यामुळे इंग्रजी, पोर्तुगीज, डच, फ्रेंच, चिनी तसेच अन्य प्रांतांतील उर्दू पर्शियन, अरेबिक अशा भाषाकोविदांनी एकत्र येऊन आंतरशाखीय अभ्यासपद्धतीद्वारे शिवचरित्राचे लेखन करावे, असे आवाहनही डॉ. साळुंखे यांनी केले.