आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Writers Complain Against Sabnis, Vaidya Over Election Process

सबनीस, वैद्य, अाडकरांवर गुन्हा नोंदवावा, महामंडळाविरुद्ध साहित्यिकांची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सदोष होती. या प्रक्रियेसाठी जबाबदार असणाऱ्या महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य, निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद आडकर आणि नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार साहित्यिक आणि प्रकाशकांनी बुधवारी मुंबईत वि. प. मार्ग पोलिस ठाण्यात केली आहे.

प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील, राजन खान, महेश केळुस्कर, भारत सासणे, प्रकाशक अनिल कुलकर्णी, अरुण म्हात्रे आदींनी ही तक्रार दिली. तक्रारदारांमध्ये मसापच्या भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे आणि सतीश बोरडे यांचाही समावेश आहे. येत्या महिन्यात महामंडळाचे फिरते कार्यालय नागपूर येथे जाणार असल्याने या संदर्भातील कागदपत्रे पोलिसांनी त्वरित ताब्यात घ्यावीत अन्यथा ती नष्ट करण्याचा प्रयत्न होईल, असेही पाेलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
घटनेनुसारच प्रक्रिया
संमेलनाध्यपदाची निवडणूक प्रक्रिया घटनेनुसारच राबवली आहे. निवडणूक होऊन गेल्यावर अडीच महिन्यांनी त्याविषयी तक्रार दाखल करणे योग्य आहे का? शिवाय ज्या उमेदवारांनी ही निवडणूक लढवली, त्या प्रत्येकाची निवडणूक पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने झाली असून आम्हाला ती पूर्ण मान्य आहे, अशी लिखित व स्वाक्षरी असणारी प्रत उपलब्ध आहे.
अॅड. प्रमोद आडकर, निवडणूक अधिकारी