आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबादच्या पाेलिस अायुक्तपदी यशस्वी यादव, अमितेशकुमार, रेड्डी यांची मुंबईत बदली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- अाैरंगाबादचे पाेलिस अायुक्त अमितेश कुमार यांच्यासह राज्यातील १३७ वरिष्ठ पाेलिस अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी बदल्या झाल्या. ठाण्याचे अप्पर पाेलिस अायुक्त यशस्वी यादव यांच्याकडे अाता अाैरंगाबादची जबाबदारी असेल. तर अमितेश कुमार मुंबई येथे सहअायुक्तपदी (वाहतूक) रुजू हाेतील.  मुंबई शहर वाहतूक विभागाचे पाेलिस सहअायुक्त मिलिंद भारंबे यांना अाैरंगाबाद परिक्षेत्राचे नवीन विशेष पाेलिस महानिरीक्षकपदाचा कार्यभार सोपवण्यात अाला. अाैरंगाबाद ग्रामीणचे अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची मुंबईत उपायुक्तपदी बदली झाली. त्यांची जागा डाॅ. अारती सिंह घेतील.  हर्सूल कारागृहाचे नवे पाेलिस उपमहानिरीक्षक म्हणून साहेबराव पाटील हे जबाबदारी सांभाळतील. दीपाली धाटे व विनायक ढाकणे हेही पाेलिस उपायुक्त म्हणून अाैरंगाबादला बदलून अाले अाहेत.
 
हे पण वाचा...
बातम्या आणखी आहेत...