पुणे- कोकणातील राजापूर तालुक्यातील नाटे या गावात 16 व्या शतकात मोघलांनी बांधलेल्या ऐतिहासिक यशवंतगड किल्ल्याची विक्री अवघ्या 35 लाख रूपयांत झाल्याचे माहिती अधिकारात पुढे आले आहे. स्वातंत्र भारतात गड, किल्ल्यांना राष्ट्रीय मालमत्ता जाहीर करण्यात आले तसेच त्याला हेरिटेजचा दर्जा देण्यात आल्यानंतर या किल्ल्याची विक्री कशी काय करण्यात आली असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे या किल्ल्याची विक्री अवघ्या एका फ्लॅटच्या किंमतीत केल्याने तर अधिकच आश्यर्च व्यक्त करण्यात येत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते समीर शिरवडकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यात वसलेल्या यशवंतगडाची माहिती मागवली होती. त्यात हा किल्ला विकल्याचे पुढे आले आहे. सरकारने माहितीच्या अधिकारात दिलेल्या माहितीनुसार, सध्या हा किल्ला आंबोळगड येथील अरविंद तुकाराम पारकर यांना 99 वर्षाच्या भाडेपट्टा कराराने देण्यात आला आहे. तसेच या किल्ल्याचा 7/12 हा विश्वनाथ रघुनाथ पत्की यांच्या नावावर निघत आहे. याचाच अर्थ मूळ मालकी पत्की यांच्याकडे आहे. तसेच या किल्ल्याची ऑक्टोबर 2012 मध्ये विक्री झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट होत आहे.
पुढे पाहा, यशवंतगडाची छायाचित्रे...