आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yasin Bhatkal Sent To 14 day Magisterial Custody For Test Identification Parade

अतिरेकी यासीन भटकळची न्यायालयीन कोठडीत रवानगी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - इंडियन मुजाहिदीन संघटनेचा दहशतवादी व जर्मन बेकरी बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी यासीन भटकळ याची 14 दिवसांची पोलिस कोठडी संपल्याने त्याला दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) शुक्रवारी पुणे सत्र न्यायालयात हजर केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. डी. दरणे यांनी भटकळची न्यायालयीन कोठडीत रवानगी करत ठाणे कारागृहात त्याची ओळख परेड घेण्यास परवानगी दिली आहे.

एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त शांताराम तायडे यांनी भटकळला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. त्यानंतर न्यायाधीशांनी त्याला पोलिसांविरोधात तक्रार आहे का, अशी विचारणा केली असता त्याने नकारार्थी उत्तर दिले. विशेष सरकारी वकील विकास शहा यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, भटकळला सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याची परवानगी मिळावी. येथे त्याच्या ओळख परेडसाठी जाणार्‍या साक्षीदारांची नावे व पत्ते जाहीर न करण्याची मागणी त्यांनी केली. न्यायालयाने दोन्ही मागण्या मान्य करत त्याची ओळख परेड ठाणे कारागृहातच होईल, असे सांगितले.