आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याची ‘यलो’ गर्ल गौरी गाडगीळ झाली पदवीधर, समाजशास्त्र विषयात पदवी प्राप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - आपल्या वाट्याला आलेल्या प्रतिकूलतांविषयी तक्रारी न सांगता, त्यावर मात करून यशाचा मार्ग कशा चालता येतो, हे ‘यलो’ गर्ल गौरी गाडगीळने दाखवून दिले आहे. ‘डाऊन सिंड्रोम’ या विकाराने ग्रस्त असूनही गौरीने समाजशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली आहे.   
 
गौरीच्या या संघर्षयात्रेवर सन २०१४ मध्ये आलेल्या ‘यलो’ या चित्रपटाने प्रेक्षकांसह जाणकारांची दाद मिळवली होती. गौरीच्या जिद्दीला पाठबळ देत तिच्या आईने, स्नेहा गाडगीळ यांनीही गौरीच्या या संघर्षात मोलाचे योगदान दिले आहे. ‘गौरीने पुण्यातील स. प. महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. कॉलेजने पदवीप्रदान समारंभ आयोजित केल्यावर गौरीचा विशेष सत्कार आणि सन्मान केला’, असे त्या म्हणाल्या. गौरीने समाजशास्त्र हा विषय घेऊन पदवी प्राप्त केली आहे. 

तिने ५८ टक्के मिळवले आहेत. कॉलेजने गौरीचे हे यश सेलिब्रेट करण्यासाठी पदवीप्रदान समारंभात तिला गाऊन आणि कॅप या पोशाखात सर्वांच्या साक्षीने प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवीचे प्रमाणपत्र प्रदान केले आणि गौरीचे कौतुक केले. पदवीनंतर आता गौरीचे लक्ष्य पदव्युत्तर पदवी मिळवण्याचे आहे. मात्र, पोहणे आणि भरतनाट्यम यातही तिला खूप रस असल्याने आणि तिचे दोन्हीचे प्रशिक्षण सुरू असल्याने बहि:स्थ पद्धतीने गौरीने पुढील शिक्षण घेण्याचा मानस व्यक्त केला आहे, असे स्नेहाताई म्हणाल्या.    

गाऊन आणि कॅपचे स्वप्न पूर्ण  
मी कॉलेजमध्ये प्रवेश केल्यापासून पदवीप्रदान समारंभप्रसंगी घालण्यात येणाऱ्या गाऊनचे आणि कॅपचे आकर्षण मला वाटत होते. आपणही अशा पोशाखात स्टेजवर जाऊन पदवीचे प्रमाणपत्र मिळवावे, हे माझे स्वप्न होते. ते आज पूर्ण झाल्याने प्रचंड आनंद झाला आहे, अशा शब्दांत गौरीने भावना व्यक्त केल्या.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...