आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Yield Of Grape Increases Highly In Maharashtra, Exports In China & All Over World

द्राक्ष उत्पादन वाढले : निर्यातीचा वेलू गगनावरी, महाराष्ट्राच्या द्राक्षांची चीनलाही गोडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- आतापर्यंत देशातील 8 हजार 344 टन द्राक्षांची युरोपात निर्यात झाली असून मार्चमध्ये हा वेग वाढणार आहे. युरोपसह चीन, बांगलादेश आणि आखाती देशांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा अधिक द्राक्ष निर्यात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी या निर्यातीतून भारताला बारा अब्ज रुपयांपेक्षा अधिक रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. निर्यातीचा आकडा आणि उत्पन्न या दोन्हीत यंदा वाढ होण्याची चिन्हे आहेत.
यंदा राज्यातील 14 हजार हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची नोंदणी निर्यातीसाठी झाली आहे. आजवरची ही सर्वाधिक नोंदणी आहे. निर्यातक्षम बागांचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा जवळपास सहा टक्क्यांनी वाढले आहे. नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, नगर हे प्रमुख द्राक्ष उत्पादक जिल्हे असून एकूण सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. जानेवारीमध्ये सुरू झालेला द्राक्ष निर्यातीचा हंगाम एप्रिल अखेरपर्यंत चालेल.
कृषी आणि प्रक्रियायुक्त अन्न निर्यात विकास प्राधिकरण (अपेडा)चे उपमुख्य व्यवस्थापक डॉ. सुधांशू यांनी 'दिव्य मराठी'ला सांगितले, 'युरोपीय देशांच्या काटेकोर नियम-निकषांमुळे युरोपातील द्राक्ष निर्यात सर्वाधिक आव्हानात्मक असते. हे आव्हान पेलणारे बागायतदार सध्या फक्त महाराष्ट्रातच असल्याने युरोपातील शंभर टक्के द्राक्ष निर्यात महाराष्ट्रातूनच होते. गेल्या वर्षी 25 फेब्रुवारीपर्यंत युरोपात 5 हजार 211 टन द्राक्ष निर्यात झाली. 25 फेब्रुवारीपर्यंत हाच निर्यातीचा आकडा 3 हजार टनांनी वाढलेला दिसतो. यंदाच्या निर्यातीचा वेग पाहता हा आकडाही यंदा मागे पडण्याची आशा आहे.' br> द्राक्ष निर्यातीमध्ये भारतात महाराष्ट्राची, तर राज्यात नाशिक जिल्ह्याची मक्तेदारी आहे. यंदा युरोपात झालेल्या निर्यातीमधली 7850 टनांची निर्यात एकट्या नाशिकमधून झाली आहे. देशाच्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी 94 टक्के निर्यात नाशिकने केली असून यातून द्राक्ष बागायतदारांनी आतापर्यंत सत्तर कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. नाशकातून होणार्‍या द्राक्षनिर्यातीवर देशाच्या निर्यातीचे चित्र अवलंबून असेल.
महाराष्ट्रातील दाक्षांविषयी आणखी वाचण्यासाठी पुढे क्लिक करा..
पुढे वाचा, बारा अब्ज रुपयांची द्राक्षे...
भारतीय द्राक्षांची गोडी चीनलाही...
निर्यातक्षम द्राक्षांना दुप्पट भाव...
मागील तीन वर्षात किती टन द्राक्ष निर्यात केली...