आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक किर्तीचे योगाचार्य बी. के. एस अय्यंगार अनंतात विलीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र- योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार)
पुणे- योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार (वय 96) यांचे आज मध्यरात्री पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील प्रयाग रूग्णालयात अय्यंगार यांनी शेवटचा श्वास घेतला. मागील आठवड्यापासून त्यांच्यावर या रूग्णालयात उपचार सुरू होते. आज सायंकाळी चारच्या सुमारास पुण्यात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अय्यंगार यांच्या निधनामुळे दु:ख व्यक्त केले आहे. योग क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे अय्यंगार यांना पुढील अनेक पिढ्या स्मरणात ठेवतील असे मोदींनी टि्वटरवर म्हटले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अय्यंगार यांच्या निधनामुळे दुःख व्यक्त केले आहे. योगविद्येला सन्मान मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व हरपलं अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पित केली आहे. केंद्र सरकारने अय्यंगार यांना यंदाच्या वर्षीच पद्मविभूषण हा पुरस्कार देऊन गौरव केला होता.
अय्यंगार व त्यांच्या कार्याविषयी...
- कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातल्या बेल्लूर येथील गरीब अय्यंगार (ब्राह्मण) कुटुंबात 1918 साली जन्म
- आई-वडिलांच्या 13 अपत्यांपैकी बी. के. एस. अय्यंगार 11 वे अपत्य
- 1934 साली अय्यंगार म्हैसूरला गेले व तेथे योगासनांचे प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.
- योगाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी 1937 साली पुण्यात स्थायिक झाले.
- 1974 साली पुण्यात योग प्रशिक्षणासाठी संस्थेची स्थापना केली.
- सत्तरच्या दशकात त्यांनी जिद्दू कृष्णमूर्ती, राजकीय नेते जयप्रकाश नारायण, व्हायोलीन वादक येहुदी मेनुहिन, बेल्जियमच्या राणी एलिझाबेथ यांना योगाचे धडे दिले.
- अय्यंगार यांच्या योगा संस्थांचा 137 देशात पसारा आहे.
- अय्यंगार योग, पातंजली योग, प्राणायाम, योगा, योगासने यासंबंधित 15 पुस्तके लिहली. जगभरातील विविध भाषांत त्याचे भाषांतर
- 1991 साली पद्मश्री पुरस्कार
- 2002 साली पद्मभूषण पुरस्कार
- 2004 साली टाइम मॅगझिनने जगातील सर्वाधिक प्रभावी 100 व्यक्तींच्या यादीत अय्यंगार यांना स्थान दिले होते.
- 2014 साली पद्मविभूषण पुरस्कार.
पुढे पाहा अय्यंगार यांचे योगासनाचा एक खास व्हिडिओ...