आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुजींचे साधक सद्‍गदित; गुरुजींची ख्याती ऐकून अनेक जण भारतात!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- गुरुजींनी आमच्यावर खूप प्रेम केले. त्यांनी योग प्रशिक्षित तर केलेच, पण जगण्यातला आनंद नेमका कसा मिळवायचा आणि टिकवायचा, याचेही मार्गदर्शन केले. ते पार्थिव रूपाने आता नसले, तरी ते आमच्या अंतरंगात कायमचे असतील, अशी भावना योगाचार्य अय्यंगार गुरुजींच्या अनेक विदेशी शिष्यांनी येथे साश्रू नयनांनी व्यक्त केली.

दक्षिण आफ्रिकेतून गुरुजींकडे शिकण्यासाठी आलेल्या कार्ला आणि गॉडरिन या दोघी जणी सद्‍गदित कंठाने म्हणाल्या, चार वर्षांपासून आम्ही गुरुजींचे मार्गदर्शन घेत आहोत. त्यांनी आमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन दिला. विज्ञानाधारित योगपद्धती विकसित केली. योगक्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. ते आता नसले तरी त्यांनी दाखवलेल्या मार्गानेच आम्ही मार्गक्रमण करू.

सिंगापूर येथील चाऊ तुक केआँग हा युवक तर अवघ्या 4 आठवड्यांपूर्वी योग प्रशिक्षण केंद्रात आला होता. त्यालाही अश्रू आवरत नव्हते. गुरुजींची ख्याती ऐकून मी नुकताच त्यांच्या मार्गदर्शनासाठी केंद्रात आलो होतो, पण आजारपणामुळे मला ते भाग्य प्रत्यक्षात मिळाले नसले, तरी गुरुजींच्या शिष्यांकडून मी शिकणार आहे, असे तो म्हणाला.

(फोटो: तिबेटी बौद्ध धर्मगुरू दलाई लामांसोबत गळाभेट घेताना योगाचार्य.)
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, योग हाच ध्यास अनयोग हाच श्वास....