आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

छेडछाडीच्या संशयावरून गावातील मारहाणीमुळे तरूणाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बारामती - देशभर छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन मुली व तरूणी आत्महत्या करून जीवनयात्रा संपवत आहेत. मात्र छेड केल्याच्या संशयावरून मुलींच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी भररस्त्यावर मारहाण केल्याने एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा गंभीर प्रकार बारामती तालुक्यात देऊळगाव रसाळ येथे स्वातंत्र्यदिनीच घडला आहे. प्रकरणी तरूणीसह तिच्या कुटुंबियांवर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार मयत तरूण संतोष बाळासाहेब रसाळ (वय २४)याने आपली मुलीची छेड काढल्याचा संशयावरून तो कामावरून घरी जाताना जळगाव सुपे (ता.बारामती) या गावातील मुलीचे कुटुंबीय व नातेवाईकांनी गावातच संतोषला बेदम मारहाण केली.

भररस्त्यावर बेदम मारहाणीचा अपमान जिव्हारी लागल्याने संतोष घरी येऊन रात्री घरासमोरील शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनिल कांतीलाल जगताप,विलास पोपट जगताप, पोपट बाबुराव जगताप, पांडुरंग विलास खोमणे, बाजीराव जगताप, सुनिता पोपट जगताप, तसेच मुलीसह आणखी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात झाला आहे. पोलीस उपनिरिक्षक शिंदे अधिक तपास करित आहेत.
बातम्या आणखी आहेत...