आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: भर दिवसा पेट्रोल पंपावर तरुणाची ठेचून हत्या, बघा विचलीत करणारा CCTV Video

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंपरी-चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर रविवारी भर दुपारी एका युवकाची हत्या करण्यात आली. - Divya Marathi
पिंपरी-चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर रविवारी भर दुपारी एका युवकाची हत्या करण्यात आली.
पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील एका पेट्रोल पंपावर रविवारी भर दुपारी एका युवकाची हत्या करण्यात आली. हा युवक गुन्हेगारी क्षेत्रातील असल्याने पूर्ववैमनस्यातून त्याची हत्या झाल्याचा संशय आहे. दुपारी साडेतीन चारच्या सुमारास पिपंरी पोलिस ठाण्याच्या जवळच असलेल्या जय हिंद पेट्रोल पंपावर 10-12 जणांच्या टोळक्याने सिमेंटचे ब्लॉक डोक्यात घालून त्याची हत्या केली.
विनायक कैलास पाटोळे (18, दत्तनगर, चिंचवड) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याची पार्श्वभूमी गुन्हेगार जगताची आहे. सहा महिन्यापूर्वी एका सराईत गुंडाची मोहननगर परिसरात हत्या झाली होती. या प्रकरणात विनायकचा सहभाग होता. त्यामुळे या हत्येचा बदला घेण्यासाठी विनायकची हत्या झाल्याचा संशय आहे. दरम्यान या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. दोघेजण अद्याप फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक रविवारी दुपारी जयहिंद पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आल्यासाठी होता. मात्र त्याच्यावर त्यावेळी पाळत ठेवण्यात आली होती. विनायक पंपावर येताच दोन-तीन तरूणांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आणखी पाच- सहा जणांनी विनायकला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळीच दोघांनी त्याच्या डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घातला. यात तो गंभीर जखमी झाला. मात्र गंभीर जखमी झाल्याने विनायकचा जागीच मृत्यू झाला. पंपावर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद झाला आहे.
विनायक केवळ 12 वी शिकत होता. त्याचे वडील टेम्पोचालक आहेत. विनायक हा एकुलता एक मुलगा होता. दरम्यान, विनायकला जबरी मारहाण होत असताना पंपावरील नागरिकांनी बघ्याची भूमिका घेतली. जर कोणी हस्तक्षेप केला असता तर विनायकचा जीव वाचला असता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुढे पाहा, या घटनेतील छायाचित्रे व CCTV त कैद झालेला थरार...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...