आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोर असल्याचे समजून पुण्यात तरूणाला जाळले; 80 टक्के भाजला, प्रकृती गंभीर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- पुण्यातील मध्यवस्तीतील कसबा पेठ परिसरातील माणिक चौकाजवळ चोरी करणारा एक चोर समजून एका तरूणाला पेट्रोल टाकून पेटविल्याची घटना घडली. बुधवारी दुपारी तीन वाजता घडलेल्या या घटनेत संबंधित तरूण 80 टक्के भाजला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. त्याच्यावर ससून रूग्णालयात उपचार सुरु आहेत.
याबाबतची प्राथमिक माहिती अशी की, कसबा पेठेतील माणिक चौकाजवळील एका सोसायटी परिसरात भंगार गोळा करण्यासाठी सावन धर्मा राठोड (वय 18) आला होता. त्यावेळी तो एका गाड्याच्या आडोशाला उभा असलेला दिसला. त्याचवेळी इबूर झुबेर आणि इम्रान नावाच्या तरूणांनी सावनला पाहिले. तो चोर आहे, गाडी किंवा गाड्यांचे पार्टस चोरायला आला असावा व आपल्याला पाहून तो गाडीच्या आड लपत आहे असे समजून या दोघांनी त्या धरून मारहाण केली. त्यावेळी त्याने आपण चोर नसल्याचे ओरडून सांगूनही त्याला मारहाण करण्यात येत होती. त्याचवेळी एका व्यक्तीने पेट्रोल काढून त्याच्या अंगावर टाकले व पाजलेही. त्यानंतर त्याला पेटवून दिले. या घटनेत तो 80 टक्के भाजला असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील आरोपींना अटक करण्यात आली आहे.