आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देहूरोड-आकुर्डी दरम्यान धावत्या रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे- देहूरोड-आकुर्डी दरम्यान धावत्या रेल्वेमधून पडल्याने एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना दुपारी साडेबारा वाजता घडली आहे. अपघात आकुर्डी रेल्वे किलोमीटर 117/26 येथे झाला आहे.
 
लोणावळ्यावरून पुण्याकडे येणाऱ्या रेल्वे मार्गावर ही घटना घडली आहे. तरुण खाली पडल्यानंतर थेट रेल्वेच्या चाकाखाली आला आणि त्याचे शरीर हे धडापासून वेगळे झाले आहे. उंची 6 फूट, निळी रंगाची ट्रॅक पॅन्ट, फुल बाह्यांचा टी शर्ट, गहूवर्णीय असे या तरुणाचे वर्णन आहे. अद्याप मृताची ओळख पटलेली नाही. पुढील तपास रेल्वे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक करदाळे हे करत आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...