आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यटनासाठी गेलेल्या युवकाचा भीमाशंकरच्या धबधब्यात पडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यात असलेल्या कोंडवळ धबधब्यात पडून वैभव ऊर्फ दीपक शंकर खानदेशी (२३, रा. मंचर) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शोधकार्य करून दीपकचा मृतदेह खोल दरीतून वर काढण्यात आला.

दीपक आपल्या काही मित्रांसह भीमाशंकर येथील मंदिरात दर्शनासाठी आला होता. सध्या पावसाळी वातावरण असल्याने माेठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी येतात. दर्शन झाल्यावर दीपक व त्याचे मित्र कोंडवळ येथील धबधबा पाहण्यास गेले. हा धबधबा तीन टप्प्यांत कोसळतो. त्याचे सौंदर्य सर्व बाजूंनी पाहता यावे यासाठी वन विभागाने धबधब्यावर झुलता फूल उभारला आहे. या पुलावरून दीपक पलीकडे गेला आणि परत येताना तोल जाऊन तो खाली पडला. खूप प्रयत्न करूनही त्याचा शाेध लागला नाही. तेव्हा पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर शोधकार्य राबवून खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला.
बातम्या आणखी आहेत...