आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी पर्यटनाचा आणखी एक बळी; भुशी डॅमजवळ पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुशी डॅमजवळ असणाऱ्या एका डोंगरावर चढताना पाय घसरुन पडल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
भुशी डॅमजवळ असणाऱ्या एका डोंगरावर चढताना पाय घसरुन पडल्याने युवकाचा मृत्यू झाला आहे. (संग्रहित फोटो)
पुणे- हडपसर येथील एका युवकाचा लोणावळ्यातील भुशी डॅमलगत एका धबधब्याजवळ पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला आहे. संतोष सोनकांबळे (वय 23) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. भुशी धरणा लगत डोंगरावर तो चढला होता. तिथे पाय घसरला आणि त्याचे डोके दगडावर आदळले. तातडीने त्यास आयएनएस रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...